Join us

रणबीर कपूर आणि आलिया भटच्या घरातील सुंदर किचन पाहिलंत का? Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 12:57 IST

रणबीर कपूर आणि आलिया भटच्या स्वयंपाकघरातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

रणबीर कपूर आणि आलिया भट हे इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल आहे. यांचे असंख्य चाहते आहेत. दोघेही चित्रपटांमधून भरपूर कमाई करतात आणि खऱ्या आयुष्यात आलिशान जीवन जगतात. मुंबईत दोघांचं आलिशान घर आहे. आलिया भट आणि रणबीर कपूर  हे बी-टाउनमधी त्या सेलिब्रिटींपैकी आहेत, ज्यांना आयुष्य खाजगी ठेवायला आवडतात. आता त्यांच्या स्वयंपाकघरातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

आलिया भट आणि रणबीर कपूर या दोघांनाही घरचं जेवण आवडतं.  जेवणात नेहमी स्वादापेक्षा पौष्टिक पदार्थांना त्यांचे प्राधान्य असते. हिरव्या भाज्या, सलाद त्यांच्या जेवणात नेहमी असते. त्याच्याकडे दोन शेफदेखील आहेत. नुकतंच त्याच्या शेफनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. ज्यात रणबीर आणि आलियाचं किचन दिसून येत आहे. 

ऑनलाइन व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये शेफ हे रणबीर आणि आलियासोबत राहासाठी स्वादिष्ट पदार्थ बनवताना दिसत आहेत. त्याचवेळी फ्रिजवर लावलेले कोल्हे, माकड, युनिकॉर्न, बनी आणि हत्तीचे गोंडस स्टिकर दिसून येत आहेत. हे स्टिकर्स लहान राहाचे प्राण्यांबद्दलचे प्रेम दर्शवत आहेत. व्हिडिओमध्ये भिंतीवर लटकलेली एक लहान फोटो फ्रेम दिसतेय. ज्यामध्ये रणबीर आणि आलियानं मुलगी राहा पाहायला मिळतेय. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.  

रणबीर कपूर आणि आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर दोघेही विकी कौशलसोबत संजय लीला भन्साळीच्या 'लव्ह अँड वॉर' सिनेमात झळकणार आहेत.  याशिवाय रणबीर येत्या काही दिवसांत संदीप रेड्डी वंगा यांचा सिक्वेल 'ॲनिमल पार्क' आणि नितेश तिवारी यांच्या 'रामायण' या चित्रपटातही दिसणार आहे. तर आलियाचा लवकरच 'अल्फा' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :रणबीर कपूरआलिया भट