Join us
Daily Top 2Weekly Top 5

​राणा दुग्गुबातीला पहायचे आहे जार्ज लुकासचे घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2017 20:43 IST

दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांच्या बाहुबली या चित्रपटात बाहुबलीचा भाऊ भल्लाळदेव ही भूमिका साकारणारा अभिनेता राणा दग्गुबाती याला हॉलिवूडमधील सायन्स ...

दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांच्या बाहुबली या चित्रपटात बाहुबलीचा भाऊ भल्लाळदेव ही भूमिका साकारणारा अभिनेता राणा दग्गुबाती याला हॉलिवूडमधील सायन्स फिक्शन सिरीज ‘स्टार वार्स’चे निर्माता जॉज लुकास हा त्याचे प्रेरणास्थान असून त्याचे घर पाहण्याची इच्छा आहे. अभिनेता राणा दग्गुबाती लवकरच ‘व्हेअर द हार्ट इज’ या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. या वेबसिरीजमध्ये राणाच्या घराची कथा पहायला मिळणार आहे. या शोमधून अभिनेत्याचे घर व त्यांची ओळख याचा मिलाफ केला जातो. या शोमध्ये समावेश झाल्यामुळे राणा उत्साहित आहे. तुला कुणाचे घर पाहणे आवडेल असा प्रश्न केल्यावर पीटीआयशी बोलताना राणा म्हणाला, हॉलिवूडपट स्टार वार्स व त्याचे निर्माता जॉर्ज लुकास हे माझे प्रेरणास्थान आहे. यामुळे निश्चितच मला त्यांचे घर पाहणे आवडेल. त्यांचे घर पाहून मी हे समजण्याचा प्रयत्न करेल की असे काय आहे जे त्यांच्यासाठी प्रेरणादायी व प्रतिभाशाली ठरते. राणाची प्रमुख भूमिका असलेला द गाझी अटॅक हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. यानंतर त्याचा बाहुबली २ हा चित्रपट येत्या एप्रिल महिन्यात रिलीज होत आहे. मागील दोन वर्षांपासून बाहुबलीची शूटिंग सुरू होती. याविषयी राणा म्हणाला, मी दीर्घकाळ चाललेल्या शूटिंग शेड्युलनंतर आता मी घरी जाण्यास उत्सुक आहे, मी माझ्या कुटुंबाशी व मित्रांशी भेटण्यास उत्सुक आहे. राणाने सांगितले की त्याला आपले घर सजविण्यात आनंद येतो. तो म्हणाला, आपल्या घर विशेषत: माझी खाजगी खोली व कार्यालयाच्या डिझायनिंगमध्ये मी रममान होतो. मी तेथे बराच काळ घालवित असल्याने मला वाटते की त्याला व्यक्तीविशेष बनविण्याचा प्रयत्न क रतो. मी माझ्या घरी आपला जास्तीत जास्त वेळ वाचनात व चित्रपट पाहण्यात घालविणे पसंत करतो.