Join us

राणा दग्गुबतीच्या 'हाथी मेरे साथी'चा दमदार ट्रेलर झाला लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 16:29 IST

हाथी मेरे साथी या त्रिभाषीय चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

इरॉस इंटरनॅशनलने आज 'हाथी मेरे साथी' या आपल्या अॅडव्हेन्चर चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित हिंदी ट्रेलरचे व्हर्च्युअल कॉन्फरन्सद्वारे अनावरण केले. ३ मार्च रोजी जागतिक वन्यजीव दिनानिमित्त निर्मात्यांनी राणा दग्गुबाती, प्रभू सोलोमन, विष्णू विशाल, श्रिया पिळगावकर आणि झोया हुसेन यांच्या उपस्थितीत चेन्नई आणि हैदराबाद येथे या त्रिभाषीय चित्रपटाचा बहुप्रतिक्षित तमीळ आणि तेलगू भाषेतील ट्रेलर रिलीज केला आणि आज या टीमने 'हाथी मेरे साथी' या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत लाँच केला.

चित्रपटाच्या तिन्ही आवृत्त्यांमध्ये राणा पूर्णपणे वेगळ्या अवतारात मुख्य भूमिका साकारत आहे. ‘हाथी मेरे साथी’च्या हिंदी व्हर्जनमध्ये तो पुलकित सम्राटसोबत मुख्य भूमिका साकारत असून विष्णू विशालसोबत कादान (तमिळ) आणि अरण्या (तेलगू) मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात श्रिया पिळगावकर आणि जोया हुसेन या अभिनेत्रीदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अरण्या आणि कादानच्या ट्रेलरने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. 

‘हाथी मेरे साथी’ ही एक अशी कहाणी आहे जी एका माणसाची (राणा दग्गुबाती) कथा सांगते, ज्याने आपले बरेचसे आयुष्य जंगलात घालवून पर्यावरणाचे रक्षण केले. ही माणूस आणि हत्ती यांच्यातील नात्याची ही एक अंतहीन कथा आहे.

राणा दुग्गाबतीसाठी ही हॅटट्रिक असेल कारण बाहुबली सीरीज आणि द गाझी अ‍ॅटॅक नंतर ‘हाथी मेरे साथी’ हा त्याचा तिसरा त्रिभाषीय चित्रपट असणार आहे. हा पॅन-इंडिया बहुभाषिक चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये २६ मार्च २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :राणा दग्गुबतीश्रिया पिळगावकर