Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाहुबलीमधील हा प्रसिद्ध अभिनेता ऑगस्टमध्ये करणार लग्न, त्याच्या वडिलांनीच दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 12:25 IST

या अभिनेत्याला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्याच्या खाजगी आयुष्याविषयी जाणून घ्यायची त्याच्या चाहत्यांना नेहमीच इच्छा असते.

ठळक मुद्देप्रेक्षकांचा लाडका राणा ८ ऑगस्टरला लग्नबंधनात अडकणार आहे. हे लग्न हैद्राबादमध्ये होणार आहे. राणाचे वडील सुरेश बाबू यांनी या लग्नाविषयी माहिती दिली आहे.

बाहुबली या चित्रपटामुळे राणा दुग्गबती हे नाव चांगलेच चर्चेत आले. त्याने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्याला बाहुबली या चित्रपटामुळे जगभरातील लोकांचे प्रेम मिळाले. राणाने काही हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. राणाला प्रचंड फॅन फॉलॉव्हिंग असून त्याचे फॅन्स सध्या चांगलेच खूश आहेत. कारण राणाने काहीच दिवसांपूर्वी तो नात्यात असल्याची कबुली देत त्याच्या प्रेयसीसोबत साखरपुडा देखील केला आहे.

आता प्रेक्षकांचा लाडका राणा ८ ऑगस्टरला लग्नबंधनात अडकणार आहे. हे लग्न हैद्राबादमध्ये होणार आहे. राणाचे वडील सुरेश बाबू यांनी या लग्नाविषयी माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वीच राणाने मिहिकासोबतचा फोटो शेअर करत आणि तिने होकार दिला असे लिहिले होते. मिहिका बजाज ही इंटेरिअर डिझायनर आहे. ड्यू ड्रॉप डिझाईन स्टुडिओ या कंपनीची ती मालकीण असून ही एक इव्हेंट मॅनेजमेंटची कंपनी आहे. तिची आई बंटी बजाज ही ज्वेलरी डिझायनर असून क्रासाला हा त्यांचा ब्रँड प्रसिद्ध आहे.

सोशल मीडियावर राणा आणि मिहिकाचा साखरपुड्यातील फोटो पोस्ट करत And it’s official!! असे  कॅप्शन देत राणाने साखरपुडा केला, ही गुड न्यूज सगळ्यांना दिली होती. बाहुबली या चित्रपटामुळे राणा दुग्गबती हे नाव चांगलेच चर्चेत आले. त्याने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्याला बाहुबली या चित्रपटामुळे जगभरातील लोकांचे प्रेम मिळाले. राणाने काही हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. राणाला प्रचंड फॅन फॉलॉव्हिंग असून त्याच्याविषयी जाणून घ्यायची त्याच्या चाहत्यांना नेहमीच इच्छा असते.

राणा दग्गुबातीचे वडील सुरेश बाबू हे प्रसिद्ध निर्माते असून हैदराबादमध्ये त्यांचा रामानायडू नावाचा स्टुडिओ आहे. ते निर्माते दग्गुबाती रामानायडू यांचे पूत्र आहेत. त्यांनी सुरेश प्रॉडक्शनची सुरुवात केली होती. या प्रॉडक्शन हाऊसचे आंध्रप्रदेश आणि तेलंगानामध्ये काही थिएटरही आहेत.

टॅग्स :राणा दग्गुबतीबाहुबली