Join us

परिवारासोबत रमले बीग बी अमिताभ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:24 IST

          बी ग बी अमिताभ यांनी आपला वाढदिवस कसा साजरा केला हे जाणुन घेण्यासाठी आपण सगळेच ...

          बी ग बी अमिताभ यांनी आपला वाढदिवस कसा साजरा केला हे जाणुन घेण्यासाठी आपण सगळेच उत्सुक आहोत. या दिवशी प्रतिक्षा बंगल्यावर जाऊन आई-वडीलांच्या स्मृतीला वंदन करून अमिताभने दिवसाला सुरूवात केली आणि परिवारासोबत जन्मदिवस साजरा केला. या दिवशी त्यांनी त्यांचे मित्र आबू संदीप यांनी बनवलेला ड्रेस परिधान केला होता. यावेळी त्यांनी टष्‍द्वीट केले 'आज मी जो कोणी आहे तो केवळ चाहत्यांमुळेच आहे.          यासाठी मी ईश्‍वराचा आभारी आहे. माझ्या वाढदिवसाला माझे फॅन्स येथे येतात, माझ्यावर भरभरून प्रेम करतात याचा मला खूप आनंद आहे.' संपूर्ण परिवारासोबत वाढदिवस साजरा करायला अमिताभला आवडते. 'ब्लॉग आणि ट्विटर वर लिहून लिहून आता मला स्वत:ला मीच पत्रकार झालो, असे वाटायला लागले आहे.'असेही त्यांनी गमतीने म्हटले.