Join us

रामगोपाल वर्मा बनविणार शशिकला यांच्यावर चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2017 18:27 IST

देशातील कोणत्याही घटनांवर चित्रपट बनविण्याबाबत रामगोपाल वर्मा हे नेहमीच तयार असतात, भलेही तो चित्रपट फ्लॉप झाला तरी चालेल. सध्या ...

देशातील कोणत्याही घटनांवर चित्रपट बनविण्याबाबत रामगोपाल वर्मा हे नेहमीच तयार असतात, भलेही तो चित्रपट फ्लॉप झाला तरी चालेल. सध्या तामिळनाडूच्या राजकारणातील शशिकला यांना झालेली अटक आणि त्यापूर्वी-नंतरच्या घटनाक्रमावर रामगोपाल वर्मा यांनी ट्विट करीत या घटनेवर चित्रपट करणार असल्याचे जाहीर केले. इतकेच नव्हे तर शशिकला यांच्या नोकरांनी त्यांच्याकडे अनेक धक्कादायक खुलासे केल्याचेही सांगितले. रामगोपाल वर्मा यांनी शशिकला यांची तुलना ‘डॉन’ अशी केली आहे. गॉडफादर या कादंबरीतील पात्र डॉन कोर्लिआॅन याप्रमाणे शशिकला या मन्नारगुडीच्या माफिया असल्याचे म्हटले आहे. इथपर्यंतच न थांबता रामगोपाल वर्मा म्हणतात, ‘जयललिता यांची आत्मा शशिकला यांना भेटण्यासाठी जेलमध्ये जाईल, असे मला वाटते आहे.’रामगोपाल वर्मा यांनी दावा केला की, जयललिता यांच्या पोयस गार्डन या निवासस्थानातील नोकरांनी जयललिता आणि शशिकला यांच्यातील संबंधाबाबत स्फोटक माहिती दिली आहे. अत्यंत हैराण करणाºया या गोष्टी ते आपल्या चित्रपटात दाखविणार आहेत.पोयस गार्डन येथील बागकाम करणाºयांच्या अनुसार मन्नारगुडीच्या माफियाने निवडल्याने अनेक आमदार पलानीस्वामी यांना पाठिंबा देत आहेत. पलानीस्वामी हे शशिकला यांच्या हातचे बाहुले असल्याचेही त्यांनी सांगितले.सध्या रामगोपाल वर्मा हे अमिताभ बच्चन यांना घेऊन सरकार ३ हा चित्रपट करीत आहेत. यापूर्वी त्यांनी सत्या, कंपनी हे चित्रपट काढले होते.