तेलगू देसम पार्टीच्या एका कार्यकर्त्याने दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. तेलगू देसम पार्टीचे सर्वेसर्वा आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या फोटोशी छेडछाड करून चुकीचा संदेश पसरवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.रामगोपाल वर्मा यांनी अलीकडे फेसबुकवर चंद्राबाबू नायडू यांचा एक फोटो शेअर केला होता. यात त्यांना वायएसआर काँग्रेस ज्वॉईन करताना दाखवण्यात आले होते. या फोटोमुळे संतप्त होत, देवीबाबू चौधरी या कार्यकर्त्याने ताडेपल्ली गुडेम पोलिस ठाण्यात रामगोपाल वर्मा यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला.
चंद्राबाबूंचा फेक फोटो वापरून फसले रामगोपाल वर्मा, एफआयआर दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 15:19 IST
तेलगू देसम पार्टीच्या एका कार्यकर्त्याने दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. तेलगू देसम पार्टीचे सर्वेसर्वा आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या फोटोशी छेडछाड करून चुकीचा संदेश पसरवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
चंद्राबाबूंचा फेक फोटो वापरून फसले रामगोपाल वर्मा, एफआयआर दाखल
ठळक मुद्देरामगोपाल वर्मा यांनी एनटीआर यांच्यावर बनवलेला चित्रपट ‘लक्ष्मी एनटीआर’ हा चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला. या चित्रपटातही चंद्राबाबू नायडू यांच्यावर टीका करण्यात आली आहे.