Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर व्हायरल झालेली आजी आहे OG 'रम्बा हो..' गर्ल; कोण आहे ही अभिनेत्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 13:32 IST

'धुरंधर'मुळे रम्बा हो...' गाणं पुन्हा गाजतंय. मात्र जुन्या गाण्यात दिसलेली अभिनेत्री आज ७० व्या वर्षीही त्या गाण्यावर तुफान नाचत आहे.

सध्या सोशल मीडियावर जिकडे तिकडे 'रम्बा हो...' गाण्याने धुमाकूळ घातला आहे. ८० च्या दशकातलं हे जुनं गाणं 'धुरंधर' सिनेमात रिक्रिएट करण्यात आलं. हे गाणं १९८१ साली आलेल्या 'अरमान' सिनेमातलं आहे. उषा उत्थुप यांनी गायलेलं हे गाणं प्रसिद्ध डान्सर कल्पना अय्यर यांच्यावर चित्रीत करण्यात आलं होतं. नुकतंच कल्पना अय्यर यांनी वयाच्या ७० व्या वर्षी पुन्हा 'रम्बा हो...'वर डान्स केला. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या अभिनेत्रीबद्दल तुम्हाला माहितीये का?

ओजी 'रम्बा हो... 'गर्ल अभिनेत्री कल्पना अय्यर या प्रसिद्धीझोतात आल्या आहेत. आज त्यांचं वय ७० वर्ष आहे मात्र त्यांचा डान्सचा उत्साह अजून तोच आहे. रम्बा हो... या त्यांच्याच गाण्याची पु्न्हा एकदा चर्चा असताना त्यांनीही साडी नेसून गाण्यावर ठेका धरला. सोशल मीडियावर त्यांचं खूप कौतुक होत आहे. लोक त्यांच्या पुन्हा प्रेमात पडले आहेत.

कल्पना अय्यर यांनी ८०-९० च्या दशकात अनेक सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या. तसंच त्यांची गाणीही गाजली. 'राजा हिंदुस्तानी' मधील लोकप्रिय 'परदेसी' गाण्यात त्या होत्या. तर 'हम साथ साथ है' मध्ये त्यांनी रीमा लागूंच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. वयाच्या १७ व्या वर्षीच त्यांनी नृत्याच्या दुनियेत प्रवेश केला. तेव्हा अक्षरश: जखमी, रक्ताळलेल्या पायासह अनवाणी डान्स केलं आहे. राजा हिंदुस्तानीवेळीही त्यांच्या पायाला दुखापत झाली होती तरी त्या नाचल्या होत्या असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. 'जब छाये मेरा जादू' हेही त्यांचं आणखी एक गाजलेलं गाणं.

नुकतंच इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत कल्पना अय्यर म्हणाल्या, " मी माझ्या मित्राच्या मुलाच्या लग्नात गेले होते. तिथे मी या गाण्यावर काहीही प्लॅनिंग नसताना डान्स केला. मी काहीच रिहर्सलही केली नव्हती. अगदी इम्प्रॉम्पटू परफॉर्म केलं आणि सोशल मीडियावर अपलोड केला. काही तासातच माझा व्हिडीओ व्हायरल झाला. सर्वांनी इतकं प्रेम केलं त्यासाठी खूप आभार. आदित्य धरचेही मी आभार मानते. त्यांच्या धुरंधर सिनेमात हे गाणं आहे आणि सगळे मला तेव्हापासून लिंक पाठवत आहेत. सगळे माझी आठवण काढत आहेत."

त्या पुढे म्हणाल्या,"मी दुबईत राहते. इतकी वर्षी मला इंडस्ट्रीची खूप आठवण आली. स्टुडिओचा वास अजूनही मला आठवतो. मी खूप काही मिस केलं. हे गाणं व्हायरल होणं माझ्यासाठी एक नवी सुरुवात घेऊन येईल अशी आशा आहे."

English
हिंदी सारांश
Web Title : 'Ramba Ho' girl Kalpana Iyer's viral dance video at 70!

Web Summary : Kalpana Iyer, the original 'Ramba Ho' girl, is back in the spotlight. At 70, her dance video went viral. Iyer shared memories of her dance journey and expressed her hope for a fresh start in the industry.
टॅग्स :धुरंधर सिनेमासंगीतनृत्यसेलिब्रिटीबॉलिवूड