Join us
Daily Top 2Weekly Top 5

कसा असेल 'रावण' अवतार? यशनं केला खुलासा, म्हणाला, "सोन्याचा मुकुट आणि चिलखत इतकं जड होतं की..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 15:14 IST

यशने आपल्या रावणाच्या भूमिकेबद्दल काही खास खुलासे केले आहेत. ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारत आहे. अभिनेत्री साई पल्लवी ही सीता मातेच्या भूमिकेत आहे. तर साऊथ सुपरस्टार 'रॉकिंग स्टार' यश (Yash) याने ''दशानन' अर्थात रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. यशने आपल्या रावणाच्या भूमिकेबद्दल काही खास खुलासे केले आहेत. ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

'रामायण'मध्ये यश यावेळी पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसणार आहे. त्याच्या लूकपासून ते अभिनयापर्यंत प्रत्येक गोष्टीवर बारकाईने काम करण्यात आले आहे. यशने सांगितले की, "या वेशभूषेत सोन्याचा मोठा मुकुट, शरीराचे चिलखत आणि जड कड्यांचा समावेश आहे. ही वेशभूषा दिसायला जितकी शक्तिशाली आहे, तितकीच ती शारीरिकदृष्ट्या दमवणारा होता".

यशने पुढे सांगितले की, तो पेहराव परिधान केल्यानंतर त्याला खऱ्या अर्थाने 'रावण' असल्याची अनुभूती मिळायची. या भूमिकेसाठी यशने केवळ बाह्य रूपावरच नाही, तर रावणाच्या मनोवृत्तीवरही सखोल अभ्यास केला. तो म्हणाला, "रावण जे करत होता, त्यामागचं कारण काय असेल, तो स्वतःला कसं पटवून देत असेल याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दिग्दर्शक नितेश तिवारी यांनीही या पात्राचे वेगवेगळे पैलू उलगडण्यात मोठी मदत केली" असं यशनं सांगितलं. 

चित्रपटातील सर्वात खास गोष्ट म्हणजे रावणाच्या दहा डोक्यांचं सादरीकरण. यशने याबाबत जास्त खुलासा टाळला असला, तरी हे सादरीकरण प्रेक्षकांसाठी खूपच रोमांचक असणार असल्याची हिंट त्याने दिली आहे. त्याच्या मते, रावणाची दहा डोकी ही त्याच्या असामान्य क्षमतेचं आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचं प्रतीक आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Yash reveals challenges of his 'Raavan' look in 'Ramayana'.

Web Summary : Yash shared insights on portraying Raavan in 'Ramayana,' noting the heavy costume and exploring the character's motivations with director Nitesh Tiwari. He hinted at an exciting depiction of Raavan's ten heads.
टॅग्स :यशरामायण सिनेमा