Join us
Daily Top 2Weekly Top 5

"रामयुग' आहे खूप मॉडर्न', कुणाल कोहलीने सांगितले वेबसीरिजबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 19:52 IST

बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माता कुणाल कोहली आता मायथॉलॉजीमध्ये आपले कौशल्य दाखवताना दिसणार आहे.

बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माता कुणाल कोहली आता मायथॉलॉजीमध्ये आपले कौशल्य दाखवताना दिसणार आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कुणाल कोहलीने त्याच्या नवा वेब शो 'रामयुग'बद्दल बऱ्याच गोष्टी सांगितले आहे. 

दिग्दर्शक कुणाल कोहलीने एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत रामयुग वेबसीरिजबद्दल सांगितले. ते म्हणाले, आम्हाला प्रेक्षकांच्या इतक्या प्रतिक्रियांची अपेक्षा नव्हती. पण ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांच्या मिळालेल्या प्रतिक्रियानंतर आम्हाला आत्मविश्वास मिळाला. ही कथा तशीच आहे जशी रामायणाची कथा आहे. पण आधुनिक टेक्नॉलॉजीचा आम्ही चांगला उपयोग केला आहे. 

ते पुढे म्हणाले की, तुम्ही पाहिले असेल की, रामानंद सागर यांच्या रामायणात आपण रथ उडताना पाहिले होते. आम्ही त्यााला आणखी खरे वाटावे यासाठी मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. ज्यामुळे ते आणखी खरेखुरे असल्यासारखे दिसत आहेत. आम्ही फक्त या वेब सीरिजमधून रामायण मॉडर्न पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ही एक मॉडर्न कथा आहे.

आमच्या रामायणात अभिनेता कबीर दुहान सिंग रावणाची भूमिका साकारत आहे. रामायणात रावणाची दहा तोंडं तर दाखवण्यात आली आहेत पण बोलताना मात्र त्याचे एकच तोंड बोलताना दिसते. पण रामयुगमध्ये मात्र दहाही तोंड लाइव्ह एक्शनमध्ये दिसणार आहे. काही रागीट तर काही आळशी तर काही मजेदार रावणाचे अनेक मूड दाखवण्यात आले असल्याचे कोहलीने सांगितले. कुणाल कोहली म्हणाला की, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वेब सीरिजमध्ये आम्ही नव्या कलाकारांसोबत काम करत आहोत. आम्ही सुरुवातीलाच ठरवले होते की आम्हाला नव्या टॅलेंडेट लोकांसोबत काम करायचे आहे. त्यामुळे या वेब सीरिजमध्ये खूप मॉडर्न असणार आहे.

टॅग्स :रामायण