मोहित रैना नाही तर ‘धोनी’चा ‘हा’ मित्र बनणार ‘बाबा रामदेव’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 15:18 IST
बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अजय देवगण सध्या बाबा रामदेव यांच्या आयुष्यावर आधारित शो बनवतो आहे, हे तुम्हाला ठाऊक आहेच. ...
मोहित रैना नाही तर ‘धोनी’चा ‘हा’ मित्र बनणार ‘बाबा रामदेव’!
बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अजय देवगण सध्या बाबा रामदेव यांच्या आयुष्यावर आधारित शो बनवतो आहे, हे तुम्हाला ठाऊक आहेच. या शोमध्ये बाबा रामदेव यांची संघर्षकथा दाखवली जाणार आहे. अनेक भागांतील ही मालिका ‘डिस्कवरी जीत’ या वाहिनीवर प्रसारित होणार आहे. ‘स्वामी रामदेव : एक संघर्ष’ असे नाव असलेल्या या मालिकेचा फर्स्ट लूक आज जारी झाला. }}}}अजय देवगणने स्वत: आपल्या सोशल अकाऊंटवर याची माहिती दिली. अजय व अभिनव शुक्ला हा शो प्रोड्यूस करत आहेत. या शोमध्ये नमन जैन हा बाबा रामदेव यांच्या बालपणीची भूमिका साकारणार आहे. हा नमन तोच, ज्याने आनंद एल राय यांच्या ‘रांझणा’मध्ये छोट्या धनुषची भूमिका साकारली होती. बाबा रामदेव यांच्या मोठेपणीची भूमिका क्रांति प्रकाश झा याच्या वाट्याला गेली आहे. यापूर्वी नीरज पांडे दिग्दर्शित ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’मध्ये क्रांतिप्रकाश झा दिसला होता. धोनीच्या मित्राची भूमिका त्याने वठवली होती. मुळचा बिहारचा असलेल्या क्रांतिने रामलीला, टैगोर की कहानिया व अनेक चित्रपटांत काम केले आहे. निश्चितपणे या शोबद्दल क्रांति प्रचंड उत्सूक आहे. क्रांतिने बाबा रामदेव यांची भूमिका साकारण्यासाठी बरीच मेहनत घेतली. बाबा रामदेव यांच्यासोबत त्याने बराच वेळ घालवला. त्याने सांगितले की, मी या शोसाठी आॅडिशन दिले होते. पण बरेच महिने मला कुठलाही रिस्पॉन्स मिळाला नाही. पण एकदिवस मला दुसºयांदा आॅडिशनसाठी बोलवले गेले. यानंतर माझे टेस्ट लूकही झाला. मी या परिक्षेत पास झालो. यानंतर पुढची प्रक्रिया सुरु झाली.या मालिकेत बाबा रामदेव यांचे बालपण आणि योगगुरू ते पतंजली साम्राज्याचे सर्वेसर्वा बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. आधी या मालिकेसाठी मोहित रैनाचे नाव चर्चेत होते.