Join us
Daily Top 2Weekly Top 5

रामविलास पासवान यांचा मुलगा आहे अभिनेता; तीन-तीन अभिनेत्रींबरोबर केला रोमान्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 18:15 IST

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवान भारतीय राजकारणातील उभारता नेता आहे. त्यांनी खूपच कमी काळात बिहारच्या राजकारणात ...

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवान भारतीय राजकारणातील उभारता नेता आहे. त्यांनी खूपच कमी काळात बिहारच्या राजकारणात स्वत:ची ओळख निर्माण केली. चिराग लोक जनशक्ती पक्षात सक्रिय आहेत. बिहारमधील जमुई लोकसभा मतदारसंघाचे ते खासदार आहेत. भारतीय राजकारणातील अखिलेश यादव, सचिन पायलट, ज्योतिरादित्य सिंधीयासारख्या तरुण नेत्यांनंतर चिराग पासवान यांचेच नाव घेतले जाते. मात्र तुम्हाला माहिती आहे काय की, चिराग पासवान एक राजकारणी असण्याबरोबर उत्कृष्ट अभिनेता आहेत? आज आम्ही तुम्हाला चिराग पासवानच्या काही माहिती नसलेल्या गोष्टी सांगणार आहोत. चिराग पासवान रामविलास पासवान यांची दुसरी पत्नी रिना यांचा मुलगा आहे. त्यांचा जन्म ३१ आॅक्टोबर १९८२ मध्ये झाला. एक युवा नेता म्हणून ओळख असलेल्या चिराग यांना संघटनात्मक कार्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी ओळखले जाते. मात्र राजकारणात येण्याअगोदर त्यांनी ग्लॅमरच्या दुनियेत स्वत:ला आजमाविले आहे. त्यांनी बॉलिवूडमध्ये ‘मिले ना मिले हम’ या चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून भूमिका साकारली. या चित्रपटात ते अभिनेत्री कंगना राणौतबरोबर बघावयास मिळाले. हा चित्रपट २०११ रोजी रिलीज झाला होता. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर एका आठवड्यात ७१ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. या चित्रपटात ते क्रिकेटपटू जहीर खानची होणारी पत्नी सागरिका घाटगे हिच्यासोबत रोमान्स करताना बघावयास मिळाले. या चित्रपटासाठी त्यांना स्टारडस्ट अवॉर्डनेही सन्मानित करण्यात आले. वास्तविक त्यांना वडिलांचा मिळालेला प्रगल्भ असा वारसा सांभाळायचा होता. त्यामुळे त्यांचे राजकारणात येणे अटळ होते. परंतु चिरागला बॉलिवूडमध्ये आणखी काही चित्रपट करायचे होते. मात्र काही अपरिहार्य कारणामुळे त्यांना लवकरच राजकारणात सक्रिय व्हावे लागले. ‘आप की अदालत’मध्ये जेव्हा रजत शर्मा यांनी, ‘तुम्ही ग्लॅमरस दुनियेत राजकारणात का आले?’ असे विचारले होते तेव्हा त्यांनी म्हटले होते की, एकदा वडिलांची प्रकृती खालविल्याने माझा राजकारणाकडे कल वाढला. दरम्यान चित्रपटात येण्याअगोदर चिरागने कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेतले. चिराग यांनी फॅशन डिझाइनिंगमध्ये नशीब आजमाविले. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सद्यस्थितीत चिराग पासवान बिहारच्या राजकारणातील प्रभावशाली नेता आहेत. केवळ पक्षच नव्हे तर संघटनात्मक कार्यावर त्यांची मजबूत पकड आहे.