बलात्कारी राम रहीमचे हे बॉलिवूड स्टार्सही आहेत भक्त; पहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2017 15:24 IST
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बलात्काराच्या आरोपांतर्गत शिक्षा सुनावली आहे. सत्संग, प्रवचन, अभिनय, ...
बलात्कारी राम रहीमचे हे बॉलिवूड स्टार्सही आहेत भक्त; पहा फोटो!
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बलात्काराच्या आरोपांतर्गत शिक्षा सुनावली आहे. सत्संग, प्रवचन, अभिनय, गायन, नृत्य करणाºया या बाबाने आपल्या हटके लाइफस्टाइलने बॉलिवूडकरांनाही भुरळ घातली आहे. महागड्या एक्सपेंसिव्ह गाड्यांचा शौकिन असलेल्या राम रहीमची बॉलिवूडमध्ये प्रचंड लोकप्रियता आहे. आज आम्ही बॉलिवूडमधील त्याच्या भक्तांची यादी तुम्हाला सांगणार आहोत. गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या जाणाºया सनी लिओनीपासून ते अनिल कपूरपर्यंत या बाबाचे फॉलोअर्स आहेत. लांब केस आणि लांब दाडी असलेल्या या बाबाचे बॉलिवूडमधील कोण-कोण फॉलोअर्स आहेत यावर बनविण्यात आलेला एक व्हिडीओ सध्या यु-ट्यूबवर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ७ लाखापेक्षा अधिक युजर्सनी बघितले आहे. व्हिडीओमध्ये बाबासमोर शेखर सुमन, हृतिक रोशन, शिल्पा शेट्टी, सनी लिओनी, अनिल कपूर, जॉन इब्राहिम, राखी सावंत नतमस्तक होताना दिसत आहेत. त्याचबरोबर बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा भाऊ सोहेल खान हादेखील बाबाचे आशीर्वाद घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ एनएमएफ न्यूज नावाच्या यु-ट्यूब चॅनेलवर पोस्ट करण्यात आला आहे. २ मिनिटे १२ सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरही अपलोड केल्याने तो चांगलाच व्हायरल होत आहे. बाबा राम रहीम राजकारणाबरोबर क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रात प्रचंड लोकप्रिय आहे. क्रीडा क्षेत्राचा विचार केल्यास भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली त्याचा भक्त आहे. बºयाचदा राम रहीम यानेच त्याच्या प्रवचनमध्ये विराट माझा भक्त असून, मी दिलेल्या टिप्समुळेच तो चांगला खेळत असल्याचे म्हटले आहे. विराटबरोबरच भारतीय क्रिकेट संघामधील अनेक दिग्गज खेळाडूंचा राम रहीमच्या भक्त मंडळीत सहभाग आहे.