Join us

चिन्मय मांडलेकरचा 'इन्स्पेक्टर झेंडे' सिनेमा पाहून राम गोपाल वर्मांची खास पोस्ट, म्हणतात-

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 11:44 IST

'इन्स्पेक्टर झेंडे' सिनेमा पाहून राम गोपाल वर्मांची खास पोस्ट. चिन्मय मांडलेकरबद्दल काय म्हणाले?

'इन्स्पेक्टर झेंडे' सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. मनोज वाजपेयींची सिनेमात प्रमुख भूमिका आहे. चार्ल्स शोभराजला पकडणाऱ्या मधुकर झेंडे यांच्या आयुष्यावर आधारीत हा सिनेमा आहे. या सिनेमात मराठी कलाकारांची फौज आहे. भाऊ कदम, हरीश दुधाडे, ओंकार राऊत हे मराठी कलाकार मनोज वाजपेयीसोबत स्क्रीन शेअर करत आहेत. 'इन्स्पेक्टर झेंडे' सिनेमा पाहून प्रख्यात दिग्दर्शक राम गोपाल वर्मांनी खास पोस्ट लिहिली आहे. जाणून घ्या.

'इन्स्पेक्टर झेंडे' पाहून राम गोपाल वर्मा काय म्हणाले?

चिन्मय मांडलेकरने सोशल मीडियावर राम गोपाल वर्मांनी लिहिलेली पोस्ट शेअर केली आहे. राम गोपाल वर्मा लिहितात, ''जेव्हा मी इन्स्पेक्टर झेंडे सिनेमात विनोदी कथानक आहे असं ऐकलं तेव्हा, चार्ल्स शोभराजसारख्या थंड डोक्याच्या गुंडाभोवती हे कथानक कसं असणार याची मला शंका होती. पण जेव्हा मी सिनेमा पाहिला तेव्हा हे विनोदी कथानक सिनेमाचं खास वैशिष्ट्य आहे हे मला जाणवलं. मनोज वाजपेयी आणि चिन्मय मांडलेकरचं अभिनंदन. इन्स्पेक्टर झेंडे नेटफ्लिक्सवर नक्की बघा.'' अशा शब्दात राम गोपाल वर्मांनी चिन्मय मांडलेकरचं कौतुक केलंय.

मराठमोळे पोलीस अधिकारी मधुकर झेंडेंनी चार्ल्स शोभराजला (Charles Sobhraj) दोनवेळा पकडलं होतं. त्यांच्याच धाडसी कामगिरीवर आधारीत हा चित्रपट आहे. सिनेमात मनोज वाजपेयी 'इन्स्पेक्टर मधुकर झेंडे' यांची भूमिका साकारत असून, जिम सरभ (Jim Sarbh) 'स्विमसूट किलर' कार्ल भोजराज (चार्ल्स शोभराज) या चोराची भूमिका निभावत आहे. तर भालचंद्र कदम, गिरीजा ओक आणि हरीश दूधाडे हे मराठी कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. मनोज वाजपेयीसोबत मराठी कलाकारांची फौज असल्याने सर्वांना या सिनेमाची चर्चा आहे.

टॅग्स :चिन्मय मांडलेकरमनोज वाजपेयीराम गोपाल वर्मानेटफ्लिक्स