रितेश देशमुखची महत्त्वाकांक्षी ऐतिहासिक सिनेमा 'राजा शिवाजी' १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज सुरुवात केली आहे. रितेश देशमुखने स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शन, सह-लेखन आणि मुख्य भूमिका साकारली असून, प्रेक्षक व समीक्षकांकडून या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अशातच प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी 'राजा शिवाजी' पाहून लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे.
राम गोपाल वर्मा यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव
प्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनीही या चित्रपटाचे आणि रितेशच्या अभिनयाचे तोंडभरून कौतुक केले आहे. त्यांनी 'X' वर त्यांनी लिहिले की, "हे जेनेलिया, तुमचा चित्रपट 'राजा शिवाजी' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे, त्याबद्दल तुमचे अभिनंदन! रितेश दिग्दर्शक आणि अभिनेता अशा दोन्ही रूपांत चित्रपटगृहात धुमाकुळ गाजवत आहे. रितेशला पाहणं म्हणजे मोठ्या पडद्यावर शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म झाल्यासारखं वाटतंय.'', अशी पोस्ट राम गोपाल वर्मांनी केली आहे.
Web Summary : Ritesh Deshmukh's 'Raja Shivaji' roared at the box office. Ram Gopal Varma praised Ritesh's direction and acting, calling it Shivaji Maharaj's rebirth on screen. The film stars Sanjay Dutt, Abhishek Bachchan, and Vidya Balan. It earned ₹12.40 crore on its opening day.
Web Summary : रितेश देशमुख की 'राजा शिवाजी' ने बॉक्स ऑफिस पर धूम मचा दी। राम गोपाल वर्मा ने रितेश के निर्देशन और अभिनय की प्रशंसा करते हुए इसे शिवाजी महाराज का पुनर्जन्म बताया। फिल्म में संजय दत्त, अभिषेक बच्चन और विद्या बालन भी हैं। पहले दिन फिल्म ने ₹12.40 करोड़ कमाए।