अलीकडे ‘सरकार3’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी राम गोपाल यांनी नकळतपणे जितेन्द्र यांना कमी लेखले होते. ‘सरकार’ सीरिजमध्ये अमिताभ बच्चनऐवजी जितेन्द्रला घेतले असते तर हा चित्रपट अजिबात चालला नसता, असे ते नकळतपणे बोलून गेले होते. आता त्यांनी टायगरला डिवचले आहे. राम गोपाल वर्मा सध्या आगामी ‘सरकार ३’ या चित्रपटात बिझी आहेत. ‘सरकार’ सीरिजमधील हा तिसरा भाग आहे. विशेष म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन, अभिनेता अमित साध, यामी गौतम यांच्यासोबतच टायगरचे वडील म्हणजेच अभिनेता जॅकी श्रॉफसुद्धा या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.Hey @bindasbhidu all my tweets on @iTIGERSHROFF are purely as ur fan and not otherwise ..please tell this to @AyeshaShroff and him pic.twitter.com/9a53ogH4b9— Ram Gopal Varma (@RGVzoomin) 2 March 2017
राम गोपाल वर्मा यांनी टायगर श्रॉफला म्हटले ‘बिकनी बेब’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2017 15:30 IST
राम गोपाल वर्मा त्यांच्या चित्रपटांपेक्षा twitterवरील त्यांच्या वक्त्व्यासाठीच अधिक चर्चेत असतात. काल-परवा राम गोपाल वर्मा ज्येष्ठ अभिनेते जितेन्द्र यांच्याबद्दल ...
राम गोपाल वर्मा यांनी टायगर श्रॉफला म्हटले ‘बिकनी बेब’!
राम गोपाल वर्मा त्यांच्या चित्रपटांपेक्षा twitterवरील त्यांच्या वक्त्व्यासाठीच अधिक चर्चेत असतात. काल-परवा राम गोपाल वर्मा ज्येष्ठ अभिनेते जितेन्द्र यांच्याबद्दल नको ते बोलून गेले आणि आता त्यांनी बॉलिवूडमध्ये अगदीच नवख्या असलेल्या टायगर श्रॉफला लक्ष्य केले आहे. टायगरला लक्ष्य करण्यामागे राम गोपाल यांचा काय उद्देश आहे, हे माहित नाही. पण त्याच्या या tweetवरून टायगरबद्दलची नाराजीच दिसते. टायगरचा एक शर्टलेस फोटो पोस्ट करत राम गोपाल वर्मा यांनी त्याला ‘बिकनी बेब’ असे संबोधले आहे. ‘अशी पोझ फक्त आणि फक्त ‘गे’च देऊ शकतात. खरा पुरूष नाही,’असे राम गोपाल यांनी लिहिले. मग काय, यावर ब-या-वाईट प्रतिक्रिया उमटणारच. टायगरच्या चाहत्यांना शेवटी राम गोपाल यांचे हे tweet कसे झेपणार. त्यांनी लगेच यावर तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या. मग काय, प्रकरण अंगलट येणार, अशी चिन्हे दिसताच राम गोपाल यांनी संबंधित tweet डिलिट केले. पण तोपर्यंत या tweetचे स्क्रीन शॉट सगळीकडे व्हायरल झाले होते.याप्रकरणी सावरासावर करायलाही ते विसरले नाही.