Join us

अन् धोनीची ‘गर्लफ्रेन्ड’ बनता बनता राहिली रकुल प्रीत सिंह!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 14:39 IST

‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या नीरज पांडे दिग्दर्शित चित्रपटात अभिनेत्री दिशा पटनी हिने धोनीच्या पहिल्या गर्लफ्रेन्डची ...

‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या नीरज पांडे दिग्दर्शित चित्रपटात अभिनेत्री दिशा पटनी हिने धोनीच्या पहिल्या गर्लफ्रेन्डची भूमिका साकारली होती. हा दिशाचा पहिला चित्रपट होता. यातील दिशाच्या अभिनयाचे जोरदार कौतुक झाले होते. पण कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल, दिशाने साकारलेली ही भूमिका सर्वप्रथमच वेगळ्याच अभिनेत्रीला आॅफर झाली होती. ही अभिनेत्री कोण तर ‘यारियां’ फेम रकुल प्रीत सिंह.होय, खुद्द रकुल हिनेच अलीकडे एका मुलाखतीत हे सांगितले. लवकरच रकुल ‘अय्यारी’ या चित्रपटात दिसणार आहे. या महिन्यात रिलीज होऊ घातलेल्या ‘अय्यारी’मध्ये रकुल सिद्धार्थ मल्होत्रासोबत आॅन स्क्रिन रोमान्स करताना दिसेल. याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये रकुल सध्या बिझी आहे. याचनिमित्ताने तिने तिच्या हातून हुकलेल्या ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’बद्दल सांगितले. मी पहिल्यांदा मुंबईत आले, तेव्हा नीरज पांडे यांच्या एका चित्रपटासाठी आॅडिशन दिले होते. या चित्रपटाचे शूटींगही सुरु झाले होते. पण पुढे हा चित्रपट बनता बनता राहिला. पुढे ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’च्या वेळेस नीरज पांडे यांनी मला फोन केला. रकुलने लगेच या चित्रपटासाठी होकार दिला. तिच्या डेट्सही लॉक झाल्यात. पण अचानक ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ थोडा लांबला. तोपर्यंत मी साऊथ स्टार रामचरण यांच्यासोबतच्या एका चित्रपटाला डेट्स देऊन चुकले होते. त्यामुळे ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ माझ्या हातून निसटला. मी या चित्रपटाचा भाग बनू शकले नाही, याचे मला कायम दु:ख असेल.  डेट्स नसल्याने माझ्या हाती काहीही नव्हते, असे रकुलने सांगितले.रकुलने आत्तापर्यंत बॉलिवूडमध्ये ‘यारियां’ हा केवळ एकच चित्रपट केला आहे. यानंतर दीर्घकाळ ती बॉलिवूडमधून गायब झाली होती. या काळात रकुलला साऊथचे अनेक मोठे चित्रपट मिळाले. रकुल याबद्दल आनंदी आहे. इंडस्ट्रीत येऊन मला केवळ पाच वर्षे झालीत. पण या पाच वर्षात माझी  स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करू शकले, याचा मला आनंद आहे, असे ती म्हणाली.