Join us
Daily Top 2Weekly Top 5

राखी सावंत पुन्हा करणार लग्न, जाणून घ्या कोणासोबत घेणार सात फेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 17:08 IST

बिग बॉस फेम आणि अभिनेत्री राखी सावंत पुन्हा लग्न करणार आहे. ही माहिती खुद्द तिनेच दिली आहे.

बिग बॉस फेम आणि अभिनेत्री राखी सावंत पुन्हा लग्न करणार आहे. ही माहिती खुद्द तिनेच दिली आहे. तुम्ही विचार करत असाल की राखी तर नेहमी दावा करत असते की ती विवाहित आहे. तर ती कोणाशी दुसऱ्यांदा लग्न करणार आहे. अभिनेत्री रेखा कोणत्या अभिनेत्यासोबत नाही तर पुन्हा तिचा नवरा रितेशसोबत लग्न करणार आहे. राखीचे म्हणणे आहे की रितेशला भारतात येऊन पुन्हा तिच्याशी लग्न करायचे आहे आणि यावेळी तो सर्वांसमोर लग्न करणार आहे.

ईटाइम्सच्या रिपोर्टनुसार, रेखा म्हणाली की, व्हिडीओ कॉल्सच्या माध्यमातून माझे रितेशचे बोलणे होत असते. त्याच्या व्हिसामध्ये काही तरी समस्या येत आहे आणि काही कायदेशीर गोष्टी आहेत ज्या पूर्ण करत आहे. त्यानंतर त्याला सर्वांना आमच्याबद्दल सांगायचे आहे. त्यांनी मला सांगितले की ते आमच्या नात्याबद्दल सर्वांसमोर बोलणार आहे. उलट, यावेळी ते पुन्हा माझ्याशी लग्न करणार आहेत आणि यावेळी सर्वांसमोर. 

राखी सावंतने २०१८ साली रितेशसोबत लग्न केले होते. राखीने इंस्टाग्रामवर तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले होते ज्यात ती वधूच्या गेटअपमध्ये मंडपात बसलेली दिसते आहे. या फोटोत राखीचा नवरा दिसत नव्हता. राखीच्या लग्नाला तीन वर्षे झाली आहेत पण तिच्या नवऱ्याला आजपर्यंत कुणीच पाहिलेले नाही. राखीचा नवरा कधीच तिच्यासोबत मीडियासमोर आला नाही किंवा तिच्या फ्रेंड्सला भेटला नाही. त्यामुळेच लोक राखीच्या लग्नाला पब्लिसिटी स्टंट मानतात. मात्र ती नेहमी माझे रितेशसोबत लग्न झाल्याचे सांगते.

बिग बॉसमध्ये राखी सावंत आपल्या लग्नात येणाऱ्या अडचणींचा उल्लेख केला होता आणि सांगितले होते की तिचा नवरा आधीपासून विवाहित आहे. त्याला एक बाळदेखील आहे आणि ही गोष्ट रितेशने राखीपासून लपवली होती. असेदेखील वृत्त आहे की राखी तिच्या नवऱ्यासोबत डान्सिंग रिएलिटी शो नच बलिएमध्ये दिसणार आहे.

टॅग्स :राखी सावंतबिग बॉस १४बिग बॉस