Join us

Rakhi Sawant : राखी सावंत पुन्हा होणार नवरी; पाकिस्तानात लग्न, भारतात रिसेप्शन अन् हनिमूनसाठी स्वित्झर्लंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 12:18 IST

Rakhi Sawant : राखीने पाकिस्तानमधील लग्नाबद्दल सांगितलं. राखी म्हणाली, मला पाकिस्तानमधून खूप प्रपोझल येत आहेत.

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत तिच्या पर्सनल लाईफमुळे खूप चर्चेत असते. तिचं दोनदा लग्न झालं आहे. पण दोन्ही नाती फार काळ टिकली नाहीत. आता राखीला तिसऱ्यांदा लग्न करायचं आहे. पण यावेळी तिला भारतात नाही तर पाकिस्तानात लग्न करायचं आहे. राखीने तिच्या ट्रिप दरम्यान मिळालेल्या लग्नाच्या चांगल्या प्रपोझलबद्दल सांगितलं.

टाईम्स ऑफ इंडियाशी झालेल्या संभाषणात राखीने पाकिस्तानमधील लग्नाबद्दल सांगितलं. राखी म्हणाली, मला पाकिस्तानमधून खूप प्रपोझल येत आहेत. जेव्हा मी पाकिस्तानला गेले तेव्हा समजलं की माझ्या मागील दोन्ही लग्नांमध्ये माझा किती छळ झाला होता. मी पाकिस्तानमध्ये लग्न करण्याचा नक्कीच विचार करेन. अनेक पाकिस्तानी आणि भारतीय कपलनी लग्न केलं आहे आणि ते अमेरिका आणि दुबईमध्ये सेटल झाले आहेत आणि चांगलं जीवन जगत आहेत. 

राखी पुढे म्हणाली, भारतीय आणि पाकिस्तानी एकमेकांशिवाय काहीही करू शकत नाहीत. मला पाकिस्तानी लोक आवडतात आणि माझे चाहतेही तिथे आहेत. डोडी खानबद्दल बोलताना राखी म्हणाली की, तो एक अभिनेता आणि एक पोलीस अधिकारी दोन्ही आहे. राखी म्हणाली, लग्न पाकिस्तानमध्ये होईल. रिसेप्शन भारतात होईल आणि आपण हनिमूनसाठी स्वित्झर्लंड किंवा नेदरलँड्सला जाऊ. आम्ही दुबईत सेटल होऊ. 

राखीचं याआधी लग्न रितेश सिंहशी झालं होतं. राखीने सुरुवातीचे काही दिवस रितेशसोबतचं नातं लपवून ठेवलं. त्यानंतर ती रितेशसोबत बिग बॉसमध्ये गेली. राखी आणि रितेशचं हे लग्न टिकलं नाही. त्यानंतर दुसरं लग्न आदिल खान दुर्राणी याच्याशी झालं. राखीने आदिल खान दुर्राणी याच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते आणि त्याला जेलमध्ये पाठवलं होतं.

टॅग्स :राखी सावंतपाकिस्तान