Join us

​राखी सावंत म्हणतेय राम रहिमच्या खोलीत मी पाहिली होती ही धक्कादायक गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 13:46 IST

राम रहिमच्या जीवनावर लवकरच राखी सावंत एक चित्रपट बनवणार आहे. राखीचा भाऊ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे तर या ...

राम रहिमच्या जीवनावर लवकरच राखी सावंत एक चित्रपट बनवणार आहे. राखीचा भाऊ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे तर या चित्रपटात राखी हनप्रीतच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच दिल्लीमध्ये सुरू झाले असून 'अब होगा इन्साफ' असे या चित्रपटाचे टायटलही निश्चित झाले आहे. हनप्रीतची भूमिका साकारणारी राखी सावंत या चित्रपटात आयटम नंबरदेखील करणार आहे. डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीमला साध्वींवर केलेल्या बलात्कारप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने २० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याने त्याच्या आयुष्यात केलेले अनेक कांड राखी 'अब होगा इन्साफ' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवणार आहे.  राम रहिमला राखी अनेक वर्षांपासून ओळखते. त्याला स्टायलिश बनवण्यासाठी मी अनेक टिप्स दिल्या असल्याचेही ती सांगते. राम रहिमच्या डेऱ्यावर देखील ती त्याला अनेक वेळा भेटायला जात असे. एवढेच नव्हे तर मुंबईत आल्यानंतर राम रहिम तिला अनेक वेळा भेटत असे. पण त्याला एकदा भेटायला गेल्यानंतर राखीने एक धक्कादायक गोष्ट त्याच्या खोलीत पाहिली असल्याचे तिने नुकतेच सांगितले आहे. राखीने तिच्या एका मुलाखतीत म्हटले आहे की, मी राम रहिमला अनेक वर्षांपासून ओळखते. सुरुवातीला हनप्रीत ही त्याची मानलेली मुलगी असल्याचे मला सांगण्यात आले होते. पण काहीच दिवसांत दाल में कुछ काला है हे माझ्या लक्षात आले. काही दिवसांनंतर तर राम रहीम हनप्रीतच्या प्रेमात वेडा झाला असल्याचे मला जाणवले. एकदा मी त्याच्या रूममध्ये एक वस्तू पाहिली होती, कोणत्याही बाबाच्या रूममध्ये ती वस्तू असूच शकत नाही असे मला वाटते. त्याच्या हॉटेलच्या रूममध्ये मी वियाग्रा पाहिले होते. आपण एक बाबा आहोत असे समाजाला सांगणाऱ्या बाबाच्या रूममध्ये वियाग्राचे काय काम हा कोणालाही पडणारा प्रश्न मला पडला होता. त्याचवेळी हा बाबा कसा आहे हे माझ्या लक्षात आले होते. Also Read : बलात्कारी राम रहीमचे हे बॉलिवूड स्टार्सही आहेत भक्त; पहा फोटो!