भारत- पाकिस्तान सीमेवर तणावाची स्थिती असताना, कॉन्ट्रोवर्सी क्वीन राखी सावंत हिने वेगळाच सूर लावला आहे. होय, आपल्या विधानांनी रोज नवे वाद ओढवून घेणारी आणि फुकटच्या लोकप्रियतेसाठी नाही नाही ते उपद्व्याप करणारी राखी आता पाकिस्तानविरोधात सीमेवर लढण्यासाठी सज्ज आहे. होय, अलीकडे राखी एका इव्हेंटसाठी लुधियानाला पोहोचली. ग्रेट खली हाही या इव्हेंटला हजर होता. या इव्हेंटमध्ये बोलताना राखीने प्रसंगी देशासाठी जीव द्यायलाही तयार असल्याचे म्हटले. देशहितासाठी मी काहीही करायला तयार आहे. गरज पडली तर शरीरावर २ हजार बॉम्ब लावून हेलिकॉप्टरमधून पाकिस्तानात उडी घ्यायलाही मी मागेपुढे पाहणार नाही, असे राखी म्हणाली.
बॉम्ब बांधून मला पाकिस्तानात फेका! राखी सावंत पुन्हा बरळली!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2019 13:56 IST
होय, आपल्या विधानांनी रोज नवे वाद ओढवून घेणारी आणि फुकटच्या लोकप्रियतेसाठी नाही नाही ते उपद्व्याप करणारी राखी आता पाकिस्तानविरोधात सीमेवर लढण्यासाठी सज्ज आहे.
बॉम्ब बांधून मला पाकिस्तानात फेका! राखी सावंत पुन्हा बरळली!!
ठळक मुद्देराखी आणि कॉन्ट्रोव्हर्सी यांचे जवळचे नाते आहे. अलीकडे तनुश्री दत्ताच्या प्रकरणामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती.