Join us
Daily Top 2Weekly Top 5

आमिर खानच्या घटस्फोटासंदर्भात राखी सावंतने केला अजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 20:25 IST

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत बऱ्याचदा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येत असते.

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत बऱ्याचदा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येत असते. अनेकदा त्यामुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. यावेळी तिने आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटासंदर्भात अजब दावा केला. ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने आमिर खानच्या घटस्फोटाचे निमित्त साधून चक्क एका स्प्रे कंपनीची जाहिरात केली आहे. जर त्यांनी या स्प्रेचा वापर केला असता तर आज त्यांच्यावर घटस्फोट घेण्याची वेळ आली नसती असे अजब विधान राखीने केले आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

आमिर खान आणि किरण राव बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक होते. जवळपास १५ वर्षे किरणसोबत आमिरने संसार केल्यानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला. त्यांच्या घटस्फोटावर सेलिब्रिटींनीदेखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र यामध्ये राखी सावंतच्या कमेंटने तर सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

राखी सावंत व्हिडीओत म्हणते आहे की, मला पर्फ्युम, कपडे, साबण, ज्वेलरी अशा वस्तूंची जाहिरात मिळावी अशी इच्छा होती. पण माझ्या नशिबात हा स्प्रे आहे. या स्प्रेचा वापर केल्यास तुमचा घटस्फोट कधी होणार नाही. हा स्प्रे मी खरेतर आमिर खानला दिला पाहिजे होता. त्यामुळे त्यांचा घटस्फोट झालाच नसता.”  तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

टॅग्स :राखी सावंतआमिर खानकिरण राव