Join us

Rakhi Sawant : Video - "आदिलने माझी काय अवस्था केलीय, मला रस्त्यावर आणलं; सर्व काही उद्ध्वस्त केलं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 11:42 IST

Rakhi Sawant : राखी सावंतचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

सोशल मीडिया क्वीन राखी सावंतची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. राखी आणि आदिल खान यांच्यातील वाद सर्वांनाच माहीत आहे. राखी उमराह करण्यासाठी गेली. उमराहून मुंबईत परतल्यानंतर तिने अचानक इस्लामबद्दल बोलायला सुरुवात केली. स्वतःला फातिमा म्हणू लागली. पण आता तिचा लूक पाहून लोकांना तिची चिंता वाटू लागली आहे. राखीने आता केस कापले आहेत. राखी सावंत म्हणते की, ती गरीब झाली आहे. आदिलने तिची अशी वाईट अवस्था केली आहे.

राखी सावंत तिचा पती आदिल खानच्या फसवणुकीबद्दल सर्वत्र चर्चा करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच राखी सावंत उमराह करून मुंबईत परतली होती. तसेच विमानतळावर तिचे जंगी स्वागत करण्यात आले. तिने पापाराझींना राखीऐवजी तिला फातिमा म्हणण्यास सांगितले. यानंतर शर्लिन चोप्रालाही आपली बहीण बनवलं आणि तिला पाठिंबा देण्याचं वचन दिलं. आता राखी सावंतचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

नवीन व्हिडिओमध्ये राखी सावंत ऑटोमध्ये बसलेली दिसली आणि ती पापाराझींना म्हणाली – "बघा माझी काय अवस्था झाली आहे. आता मी गाडीत बसायच्याही लायक नाही. सगळ्यांनी बघा, आदिलने माझी अवस्था काय केली आहे. त्याने मला रस्त्यावर आणलं आहे." राखी सावंत ऑटोमध्ये बसून 'मेरा जीवन कोरा कागज' हे गाणं गुणगुणायला सुरुवात करते आणि कॅमेऱ्यावर म्हणते, "माझं जीवन कापलेला पतंग आहे, आदिलने माझं सर्व काही उद्ध्वस्त केलं आहे."

राखी सावंत पुढे म्हणते- आदिलमुळे माझेही केस गळाले. आदिलने माझे पैसेही लुटले. बघ आता माझी काय अवस्था झाली आहे. यानंतर राखी सावंत भावूक झाली. राखी सावंतने तिचे लांब केस कापले आहेत. राखी सावंतच्या म्हणण्यानुसार, ती सध्या खूप तणावातून जात आहे आणि त्यामुळे तिचे केस गळायला लागले आहेत. राखीने तिच्या अलीकडील व्हिडिओमध्ये म्हटले होते - "पती आदिल खानने खूप स्ट्रेस दिला आहे. स्ट्रेसमुळे मला काळजी वाटू लागली आणि माझे केसही गळू लागले." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :राखी सावंत