Join us

Video - ट्यूमर सर्जरीनंतर राखी सावंतची झाली वाईट अवस्था; चालणंही झालं अवघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 12:37 IST

Rakhi Sawant : राखी सावंतवर युट्रस ट्यूमरची सर्जरी करण्यात आली आहे.

राखी सावंत सध्या प्रकृती बिघडल्यामुळे जोरदार चर्चेत आहे. राखीचा एक्स पती रितेश तिची काळजी घेत आहे. तो सोशल मीडिया आणि पापाराझींना राखीच्या तब्येतीचे अपडेट्स देत असतो. त्यामुळे चाहत्यांना तिच्याबद्दल माहिती मिळते. नुकतीच राखी सावंतवर युट्रस ट्यूमरची सर्जरी करण्यात आली आहे. त्यानंतर आता तिची प्रकृती चांगली आहे. राखीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रितेशने आता राखीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

सर्जरीनंतर राखीची वाईट अवस्था झाली असून चालणं देखील अवघड झालं आहे. व्हिडिओमध्ये राखी सावंत सर्जरीनंतर पहिल्यांदा चालताना दिसत आहे. राखीला नर्सने पकडून ठेवलं आहे. ती चालण्याचा प्रयत्न करत आहे पण तिला खूप वेदना होत आहेत. डॉक्टरही तिला समजावताना दिसतात. चालताना राखी वेदनेने रडत आहे.   राखीला एवढ्या दुखात पाहून तिचे चाहते त्रस्त झाले आहेत.

रितेशने शेअर केला व्हिडीओ 

हॉस्पिटलमधून राखी सावंतचा व्हिडिओ शेअर करताना रितेशने म्हटलं की - "मी खूप आनंदी आहे, राखीजी लवकरच आपल्यामध्ये येणार आहे. आज त्यांचं इनिशियल वॉक पाहून आनंद झाला. देवाचे आणि जनतेचे आभार". राखीला चालताना पाहून चाहते खूप कमेंट करत आहेत. ती लवकरात लवकर बरा व्हावी, अशी त्यांची प्रार्थना आहे. रितेश सर, तुम्ही राखीला सपोर्ट करत आहात हे छान आहे असं एका युजरने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने रितेश कसाही असला तरी तो तिच्या वाईट काळात तिला मदत करतो आहे असं लिहिलं. 

रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

राखी सावंतला सर्जरीनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राखीची सर्जरी यशस्वी झाल्याचं रितेशने सांगितलं होतं. मीडियाशी बोलताना तो म्हणाला होता, "काही लोक खूप हसत होते. मला असं वाटतं की असे लोक अमानवीय आहेत जे कोणाच्या तरी दुःखाची चेष्टा करतात. बघा राखीचा ट्यूमर किती मोठा आहे.  राखी तू काळजी करू नकोस, आम्ही तुझी काळजी घेऊ." 

टॅग्स :राखी सावंतहॉस्पिटल