Join us
Daily Top 2Weekly Top 5

तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 17:36 IST

 होय, तनुश्री दत्ता लेस्बियन आहे आणि तिने माझ्यावर बलात्कार केला होता, असा आरोप राखीने आज एका पत्रपरिषदेत केला.

तनुश्री दत्ता खोटारडी आहे, ड्रग अ‍ॅडिक्ट आहे, असा आरोप करणा-या आयटम गर्ल राखी सावंत हिने पुन्हा एक खळबळजनक आरोप केला आहे. होय, तनुश्री दत्ता लेस्बियन आहे आणि तिने माझ्यावर बलात्कार केला होता, असा आरोप राखीने आज एका पत्रपरिषदेत केला.साडी नेसून आणि डोक्यावर पदर घेऊन राखी सावंत या पत्रकार परिषदेतला पोहोचली. पत्रपरिषदेत पोहोचताच तिने तनुश्रीवर एकापाठोपाठ एक अनेक आरोप लावले. १२ वर्षांपूर्वी तनुश्री माझी चांगली मैत्रिण होती. त्यामुळे मी तिच्यासोबत अनेक रेव्ह पार्ट्यांना जात असे.   ड्रग्जच्या नशेत तनुश्रीने अनेकदा माझ्यावर बलात्कार केला. माझा हा आरोप खरा असून आपल्याकडे दोन साक्षीदार असल्याचे तिने म्हटले. यापैकी एक साक्षीदार पुरूष असून दुसरा महिला असल्याचे तिने सांगितले. तथापि या साक्षीदारांची नावे जाहिर करण्यास तिने नकार दिला. मात्र या साक्षीदारांना कोर्टासमोर हजर करण्यास आपण तयार आहोत, असे तने म्हटले.

विशेष म्हणजे, याचवेळी बॉलिवूडमधील लोक कधीच बलात्कार करत नाहीत, असा आश्चर्यकारक दावाही तिने केला. बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी मुली काहीही करायला तयार होतात आणि नंतर पुरूषांवरचं आरोप करतात. हीच स्थिती कायम राहिली तर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही असे आरोप होतील, असे सांगत पंतप्रधानांनी ‘बेटी बचाओ’प्रमाणे ‘आदमी बचाओ’ मोहिम सुरू करावी, असे आवाहनही तिने केले. मी यासाठी पंतप्रधानांना हात जोडून विनंती करते, असे ती म्हणाली. तनुश्री दत्ता-नाना पाटेकर वादात नानाची बाजू घेत  राखीने तनुश्रीवर ती ड्रग्ज घेत असल्याचा आरोप केला होता. ‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर ‘त्या’ दिवशी तनुश्री आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये ड्रग्जच्या नशेत बेशुद्ध होऊन पडली होती, असा दावा राखी सावंतने केला होता. या दाव्यानंतर तनुश्रीने जोरदार प्रतित्त्युर देत, राखी विरोधात १० कोटींचा अबु्रनुकसानीचा दावा ठोकला. तनुश्रीच्या या दणक्यानंतर  राखीने पुन्हा एकदा तनुश्रीला लक्ष्य केले आहे. काल-परवा राखीने तनुश्रीवर आगपाखड करणारे अनेक व्हिडिओ आपल्या  सोशल अकाऊंटवर शेअर केले आहेत. नाना पाटेकर आणि राज ठाकरे यांच्याकडून तनुश्रीला काहीही लाटता आले नाही. आता ती माझ्या मागे पडली आहे. तिने माझ्यावर १० कोटींचा दावा ठोकला मी तिच्यावर ५० कोटींचा दावा ठोकणार, असे ती या व्हिडिओत म्हणाली होती.

टॅग्स :राखी सावंततनुश्री दत्ता