Join us

राखी सावंतने निर्मात्यांना जम्मू-काश्मीरमध्ये चित्रीकरण करण्याचे आवाहन केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2017 15:20 IST

अभिनेत्री राखी सावंत ही नेहमीच वादग्रस्त विधाने कराताना पाहायला मिळत असते. आता ही राखी तिच्या वादग्रस्त विधानाने पुन्हा चर्चेत ...

अभिनेत्री राखी सावंत ही नेहमीच वादग्रस्त विधाने कराताना पाहायला मिळत असते. आता ही राखी तिच्या वादग्रस्त विधानाने पुन्हा चर्चेत आली असल्याचे पाहायला मिळत आहेत. तिने नुकतेच निर्मात्यांना जम्मू-काश्मीरमध्ये चित्रीकरण करण्याचे आवाहन केले आहे. इतकेच नाही तर, तिने बॉलिवूड आणि दाक्षिणात्याच नव्हे तर इतर क्षेत्रातील ही निर्मात्यांनी जम्मू काश्मीरमध्ये येऊन चित्रपटाचे चित्रीकरण करावे, असे ती म्हणाली आहे. वृत्तवाहिनीवर आपल्याला दिसणारी जम्मू काश्मीरची स्थिती खरी नाही, त्यामुळे या सुंदर परिसरात चित्रीकरण करुन पर्यटकांना प्रोत्साहन द्यावे, असे राखीने म्हटले आहे. राखी सावंत तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सध्या जम्मू- काश्मीरमध्ये आहे. शनिवारी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये राखीने काश्मीरच्या वेगवेगळ्या भागात आम्ही चित्रीकरण करत आहोत, अशी माहिती दिली. त्याचबरोबर  यावेळी तिने काही दिवसांपूर्वीच सीमारेषेवर झालेल्या शस्रसंधीच्या उल्लंघनामध्ये शहिद झालेल्या सीमा सुरक्षा दलातील जवानांना राखीने यावेळी श्रद्धांजली वाहिली.                 आयटम गर्ल म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत बºयाच कारणांनी चर्चेत असते. पण, यापूर्वी राखीच्या नावामुळे तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर चर्चेत आला होता. तसेच ती मध्यंतरी राजकारणात प्रवेश केल्याने ही चर्चेत राहिली होती. तिने बॉलिवुडसाठी कित्येक आयटम सॉन्ग केले आहेत. ही अभिनेत्री  स्वयंवर या गाजलेल्या शोमध्ये राखीने अनिवासी भारतीय एलेश परुजनवाला याच्याशी साखरपुडा केल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र त्यानंतर  टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत राखी सावंतने पैशांसाठी एलिशसोबत साखरपुडा केल्याचे म्हटले होते.