Join us

​राखी सावंत पुन्हा चर्चेत ! मायावतींविरूद्ध लढणार निवडणूक!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2016 14:15 IST

बॉलिवूडची ‘कॉन्ट्रवर्सियल गर्ल’ राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी चर्चेत येण्याचे कारण थोडे ‘राजकीय’ आहे. होय, ...

बॉलिवूडची ‘कॉन्ट्रवर्सियल गर्ल’ राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी चर्चेत येण्याचे कारण थोडे ‘राजकीय’ आहे. होय, केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी राखीला पुन्हा एकदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्याचे संकेत दिले आहेत. तेही थेट बसप प्रमुख मायावती यांच्याविरोधात. भाजपासोबत आघाडी करून उत्तरप्रदेशातील आगामी निवडणूक लढवण्याचा विचार असल्याचे आठवले म्हणाले. अलीकडे मायावती निवडणुकीपासून दूर राहतात. पण यदा कदाचित मायावतींनी आपला निर्णय बदलला आणि त्या निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्याच तर त्यांच्या विरोधात आम्ही राखी सावंतला मैदानात उतरवू, असे ते म्हणाले. राखी आणि चित्रपटसृष्टीतील इतर काही कलाकार उत्तर प्रदेशात रिपाईच्या प्रचारासाठी रिंगणात उतरतील, असेही आठवले म्हणाले. राखी रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्या महिला शाखेची अध्यक्ष आहे. आठवलेंनी केलेल्या या वक्तव्यावर राखीची प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.पण शेवटी आठवले तयार म्हटल्यावर राखी कशाला ना करेल? कारण तिलाही काम हवे आहे आणि काम मिळवण्यासाठी चर्चेतही राहायचेय. राखीसाठी तरी ही मोठी संधी असेल. ही संधी राखीने जशीच्या तशी ‘कॅश’ केलीच तर निवडणुकीआधीच उत्तर प्रदेशाचे वातावरण तापणार, यात शंका नाही. तेव्हा बघूयात, बॉलिवूडची आयटम गर्ल राखी मायावतींना कशी मात देतेय ते? राखी सावंतने यापूर्वी आसाम येथील निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पार्टीचा प्र्रचार केला होता. काही वर्षांपूर्वी राखीने स्वत:चा राजकीय पक्षसुद्धा स्थापन केला होता. महिला सुरक्षेच्या मुद्यावर राखीने निवडणुकही लढवली होती.