Join us
Daily Top 2Weekly Top 5

"खरी मेहनत माझी नाही तर...", 'धुरंधर: द रिव्हेंज'च्या यशानंतर राकेश बेदींची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 12:12 IST

राकेश बेदी यांनी पुढील प्रोजेक्टची तयारी सुरु केली आहे. 

'धुरंधर २' च्या यशाचं वारं जोरदार वाहत आहे. आदित्य धर दिग्दर्शित सिनेमाने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. सिनेमातील अभिनेते राकेश बेदींची जमील जमालीची भूमिका विशेष गाजत आहे. दोन्ही भागांमधील त्यांच्या अभिनयाचं सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.  'धुरंधर: द रिव्हेंज' मधील त्यांच्या ट्विस्टची तर चांगलीच चर्चा झाली. दरम्यान आता राकेश बेदी यांनी पुढील प्रोजेक्टची तयारी सुरु केली आहे. 

राकेश बेदी यांनी नुकतंच उज्जैन महाकालेश्वराचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी आपल्या भूमिकेच्या तयारीबद्दल चर्चा केली. तसंच त्यांनी 'धुरंधर ३' वरही भाष्य केलं. 'धुरंधर : द रिव्हेंज'च्या यशावर बोलताना राकेश बेदी म्हणाले, "सिनेमा ब्लॉकबस्टर हिट झाला आणि चांगली कमाईही करत आहे. मात्र सिनेमाची मूळ संकल्पना आणि दिग्दर्शन आदित्य धरचं आहे. आम्ही कलाकार म्हणून आमचं काम केलं पण खरी मेहनत ही आदित्यची आहे."

ते पुढे म्हणाले, "प्रत्येक भूमिका साकारण्यासाठी मेहनत करावीच  लागते. जसं आपण विराट कोहलीला सिक्स मारताना पाहतो तेव्हा बघायला ते सोपं वाटतं मात्र खरं ते तसं नसतं. अशाच प्रकारे प्रत्येक भूमिकेसाठी काही ना काही मेहनत घ्यावीच लागते."

"प्रत्येकाने भूमिकेची गरज ओळखून काम केलं. मला रणवीर सिंहला वाचवण्याचं काम होतं कारण जर कोणी गुप्तहेर दुसऱ्या देशात जात असेल तर त्याला सपोर्ट करणारा कोणीतरी असायलाच हवा. आदित्यला असं वाटलं की मी ही भूमिका करु शकतो. भारतीय सिनेसृष्टीत खलनायकाची जशी संकल्पना आहे तसा मी दिसलो नाही. मला त्याने चतुर आणि डायलॉगबाजीवाला व्हिलन बनवला",  असंही ते म्हणाले.

वरुण धवनच्या आगामी 'है जवानी तो इश्क होना है' सिनेमात राकेश बेदी दिसणार आहेत. तसंच प्राईम व्हिडीओवरील 'राख' या आगामी सीरिजमध्येही त्यांची भूमिका आहे. दोन्ही प्रोजेक्ट्सचं शूट जवळपास पूर्ण झालं असून लवकरच रिलीज होणार आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rakesh Bedi credits 'Dhurandhar' success to director Aditya Dhar.

Web Summary : Rakesh Bedi attributes 'Dhurandhar: The Revenge' success to director Aditya Dhar's vision. He praises the concept and direction, acknowledging his role alongside other actors. Bedi is now preparing for upcoming projects, including a series and a film with Varun Dhawan.
टॅग्स :राकेश बेदीरणवीर सिंगधुरंधर सिनेमाबॉलिवूड