अभिनेता राजपाल यादवनेआपल्या विनोदी शैलीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. जवळपास २० वर्षांहून अधिक काळापासून तो इंडस्ट्रीत सक्रिय आहे. अभिनेत्याचे विनोद आणि कॉमिक टायमिंगवर प्रेक्षक हसल्याशिवाय राहत नाही. सध्या हा अभिनेता गेल्या काही दिवसांपासून चेक बाऊंस प्रकरणामुळे चर्चेत आहे. या प्रकरणी राजपाल यादवने तिहार जेलमध्ये जाऊन आत्मसमर्पण केलं. आत्मसमर्पण करण्यापूर्वी "माझ्याकडं खरंच पैसेच नाहीत" हे सांगताना राजपाल यादव अत्यंत भावूक झाला होता. त्याची ही अवस्था पाहून चाहते देखील हळहळले आहेत. राजपालच्या या कठीण काळात त्याचा मित्र अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी मदतीला न आल्याचं पाहून चाहत्यांनी त्याला धारेवर धरले आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकीचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे, ज्यामध्ये तो राजपालच्या उदारतेचे कौतुक करताना दिसत आहे. नवाजुद्दीन म्हणाला होता, "जेव्हा आम्ही संघर्ष करत होतो, तेव्हा राजपालचे घर आमच्यासाठी 'लंगर' सारखे होते. मीच नाही तर अनेक कलाकार तिथे जाऊन जेवायचे आणि राहायचे. राजपालने कधीच कोणाला नकार दिला नाही". हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडिया युजर्सनी नवाजुद्दीनला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. ज्या राजपालने संघर्षाच्या काळात नवाजुद्दीनला साथ दिली, त्याच्या पडत्या काळात नवाजुद्दीन शांत का? असा सवाल विचारला जात आहे.
"माझा कोणीही मित्र नाही"तुरुंगात जाण्यापूर्वी राजपाल यादवने दिलेली प्रतिक्रिया अत्यंत हृदयद्रावक होती. आर्थिक आणि भावनिक ओझ्याखाली दबलेल्या राजपालने म्हटले, "माझ्याकडे आता पैसे नाहीत आणि दुसरा कोणताही उपायही उरलेला नाही. सर, या जगात आपण सर्व एकटेच आहोत. माझा कोणताही मित्र नाही, मला या संकटाचा सामना स्वतःच करावा लागेल".
नेमकं प्रकरण काय? राजपालने त्याच्या 'आता पता लपता' या चित्रपटासाठी मुरली प्रोजेक्ट्सकडून ५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला आणि राजपाल आर्थिक अडचणीत सापडला. कर्ज फेडण्यासाठी दिलेले चेक वारंवार बाऊन्स झाले, ज्यामुळे हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. न्यायालयाने अनेक संधी देऊनही पैसे न भरल्यामुळे अखेर राजपालला तिहार तुरुंगात जावे लागले.
Web Summary : Rajpal Yadav, facing financial woes and a jail sentence for a bounced check, finds himself without support. An old video surfaced of Nawazuddin Siddiqui praising Rajpal's generosity during his struggling days. Now, fans are questioning Nawazuddin's silence during Rajpal's difficult time, highlighting perceived lack of reciprocation.
Web Summary : राजपाल यादव, आर्थिक तंगी और चेक बाउंस के मामले में जेल की सजा का सामना कर रहे हैं, खुद को बिना समर्थन के पा रहे हैं। नवाजुद्दीन सिद्दीकी का एक पुराना वीडियो सामने आया जिसमें उन्होंने राजपाल की उदारता की प्रशंसा की थी। अब, प्रशंसक नवाजुद्दीन की चुप्पी पर सवाल उठा रहे हैं।