Join us  

राजपाल यादव आता,मराठीमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:18 AM

गेली अनेक वर्षे आपल्या विनोदी अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत आपले बस्तान बसवलेले राजपाल यादव आता मराठीतही दिसणार आहेत. लवकरच प्रदर्शित ...

गेली अनेक वर्षे आपल्या विनोदी अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत आपले बस्तान बसवलेले राजपाल यादव आता मराठीतही दिसणार आहेत. लवकरच प्रदर्शित होण्यार्‍या 'दगडाबाईची चाळ'मध्ये ते महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतील. त्यांना चांगल्या मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा होतीच. दिग्दर्शक सुनील वाईकर यांनी कथा व रोल ऐकवल्यावर त्यांनी ताबडतोब होकार कळवला. एका गाण्याच्या चित्रीकरणावेळी सकाळी सर्वांच्या अगोदर हजर होते. रिहर्सल करून सलग सोळा तास चित्रीकरण करून त्यांनी काम संपवलं. हिंदी चित्रपटात बिझी असूनही दिग्दर्शकांना म्हणाले तुमच्या मनासारखे काम झाले नसेल तर मी उद्या थांबून पुन्हा शूट करायला तयार आहे. हिंदीत मोठे नाव असूनही कोणतेही नखरे न दाखवणारा हा कलाकार खरंच उमदा कलाकार. यालाच म्हणतात कमिटमेंट!