Join us
Daily Top 2Weekly Top 5

राजपाल यादवला पुन्हा अटक होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2016 13:37 IST

अभिनेता राजपाल यादवला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. त्याने पाच वर्षांपूर्वी ‘अता पता लापता’ हा सिनेमा बनवण्यासाठी दिल्लीतील उद्योजक ...

अभिनेता राजपाल यादवला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. त्याने पाच वर्षांपूर्वी ‘अता पता लापता’ हा सिनेमा बनवण्यासाठी दिल्लीतील उद्योजक एम.जी. आग्रवाल यांच्याकडून पाच कोटींचं कर्ज घेतलं होतं. मात्र ते न चुकवल्याने, उद्योजक एम.जी आग्रवाल यांनी राजपाल यादव आणि त्याच्या पत्नीविरोधात पाच कोटींचे कर्ज बुडवल्याचा आरोप केला होता आणि या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने या संदर्भात राजपाल यादवला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते. परंतु 2013 साली राजपालने खोटं प्रतिज्ञापत्र दाखल केल्याने उच्च न्यायालयाने त्याला दहा दिवसांची शिक्षा ठोठावली. यानंतर राजपाल यादवने चार दिवसांचा तुरुंगवासही भोगला. त्याच्या वकिलांनी न्यायालयाकडे विनंती करुन त्याची सहा दिवसांची शिक्षा माफ करण्याची मागणी केली होती. पण त्याला दिल्लाबाहेर न जाण्याचे कोर्टाने आदेश दिले होते. पण काहीच दिवसात त्याला सहा दिवसांची शिक्षा भोगण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याविरोधात राजपाल यादवने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र आता ही शिक्षा माफ करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे राजपाल यादवला सहा दिवस तरी कारागृहात घालवावे लागतील.