९ कोटींच्या चेक बाऊन्स प्रकरणी बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव सध्या तिहार तुरूंगात आहे. "माझ्याकडे खरंच पैसे नाहीत" असं म्हणत काही दिवसांपूर्वीच राजपालने सरेंडर केलं. याप्रकरणी सध्या न्यायालयात खटला सुरू आहे. नुकत्याच झालेल्या जामीनाच्या सुनावणीत कोर्टाने राजपाल यादवला दिलासा दिलेला नाही. पुढील सुनावणी होईपर्यंत त्याला आणखी काही दिवस तुरुंगात राहावं लागणार आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर राजपाल यादवचे वकील भाष्कर उपाध्याय यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'अता पता लापता' या सिनेमासाठी राजपाल यादवने ५ कोटी घेतले होते. व्याजासहित आत्तापर्यंत ही रक्कम ९ कोटी इतकी झाली आहे. सिनेमा फ्लॉप झाल्याने राजपालला मोठं नुकसान झालं. पण, यापैकी अर्धी रक्कम परत केल्याचा दावा राजपालच्या वकिलांनी केला आहे. अभिनेत्याचे वकील भाष्कर उपाध्याय म्हणाले, "पाच कोटींपैकी अडीच कोटी रुपये परत केले आहेत. सोमवारी या प्रकरणात अंतिम सुनावणी होईल. इन्व्हेसमेंट म्हणून घेतलेले ५ कोटी रुपये परत करण्यास राजपाल यादवने कधीच नाही म्हटलेलं नाही. पण सुरुवातीला पैसे जेव्हा राजपालने पैसे द्यायचं ठरवलं तेव्हा कंपनीने ते घेण्यास नकार दिला होता".
"२०१२ मध्ये झालेल्या अॅग्रीमेंटच्या आधारावर हा खटला सुरू आहे. या प्रकरणात राजपाल यादवने आधीच तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगला आहे. राजपाल यादवला पैसे कोणी दिले हे सांगू शकत नाही. कारण हा कौंटुबिक विषय आहे", असंही त्यांनी सांगितलं. राजपाल यादवच्या भावाच्या मुलीचं फेब्रुवारी महिन्यात लग्न आहे. यासाठी राजपाल यादवने जामीनासाठी अर्ज केला होता. ज्याची पुढील सुनावणी १६ फेब्रुवारीला होणार आहे.
Web Summary : Rajpal Yadav is in jail for a check bounce case. His lawyer claims he repaid half of the 5 crore loan for 'Ata Pata Lapata', but the company initially refused payment. The final hearing is on Monday.
Web Summary : राजपाल यादव चेक बाउंस मामले में जेल में हैं। उनके वकील का दावा है कि उन्होंने 'अता पता लापता' के लिए 5 करोड़ के ऋण का आधा हिस्सा चुका दिया, लेकिन कंपनी ने शुरू में भुगतान करने से इनकार कर दिया। अंतिम सुनवाई सोमवार को है।