हिंदी सिनेमांमधून सर्वांना खळखळून हसवणारा अभिनेता राजपाल यादव सध्या वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. ९ कोटींच्या कर्ज फेडीत झालेल्या चेक बाऊन्सप्रकरणी राजपाल तिहार तुरुंगात होता. काही दिवसांपूर्वीच त्याला दिल्ली हायकोर्टाने अंतरिम जामीन दिला. तुरुंगाबाहेर आल्यानंतर राजपाल भाचीच्या लग्नात सामील झाला. त्याने लग्नात धमाल केली. तर आता त्याने पुन्हा कामालाही सुरुवात केली आहे. नुकताच तो सिनेमाच्या सेटवर परत आला आहे. दरम्यान चेक बाउन्सप्रकरणाची पुढील सुनावणी १८ मार्च रोजी होणार आहे. तोवर राजपाल जामीनावर बाहेर राहू शकणार आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
राजपाल यादव जवळपास १२ दिवस तिहार तुरुंगात होता. यानंतर कोर्टाने त्याला दीड कोटी भरायला लावले आणि मगच अंतरिम जामीन दिला. १७ फेब्रुवारी रोजी राजपाल तुरुंगातून बाहेर आला आणि थेट शाहजहांपूर गावी गेला. तिथे भाचीच्या लग्नात धमाल केली. डान्स केला, पोळ्या लाटल्या, पत्नीसोबत गणेशपूजाही केली. आता राजपाल मुंबईत परतला आहे. सध्या तो मुंबईत एका सिनेमाचं शूट करत आहे. याचा व्हिडीओ त्याने स्वत: सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसून राजपाल म्हणाला,'देवाच्या कृपेने आणि तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे मी आज कामावर परतलो आहे. ३० जून १९९७ साली मी मुंबई आलो होतो. १३ जुलैला पुण्यात येरवडा जेलच्या मागे मी 'स्वराज' नावाच्या मालिकेत पहिल्यांदा काम केलं. छोटासा रोल होता. तिथपासून ते आजपर्यंतचा हा प्रवास आहे. पुढच्या वर्षी मला मुंबईत ३० वर्ष पूर्ण होणार आहेत. कोणत्याही वादळ असो किंवा काही तेव्हापासून १९९७ सालापासून चेहऱ्याला मेकअप लावला ते आजपर्यंत सुरुच आहे. व्हॅनिटी मिळत आली आहेत. हे कुटुंबाचा आशीर्वाद आणि चाहत्यांच्या पाठिंब्यामुळेच आहे. माझ्यात आत्मविश्वास आला आणि अशाच प्रकारे मी तुमच्यासमोर येत राहीन."
राजपालच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याला पुन्हा काम करताना पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे. राजपाल कोणत्या सिनेमाचं शूट करतोय हे त्याने स्पष्ट केलेलं नाही. मात्र त्याला पुन्हा स्क्रीनवर हसवताना पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत.
Web Summary : Actor Rajpal Yadav, recently released on bail in a loan repayment case, attended his niece's wedding and has now resumed shooting for a film in Mumbai. He shared a video expressing gratitude for the support he received.
Web Summary : अभिनेता राजपाल यादव, जो हाल ही में ऋण चुकौती मामले में जमानत पर रिहा हुए, ने अपनी भतीजी की शादी में भाग लिया और अब मुंबई में एक फिल्म की शूटिंग फिर से शुरू कर दी है। उन्होंने समर्थन के लिए आभार व्यक्त करते हुए एक वीडियो साझा किया।