Join us

"एग्ज फ्रीज करण्यापेक्षा प्रेग्नंट होणं जास्त सोपं आहे...", पत्रलेखाचा तरुण मुलींना मोलाचा सल्ला, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 18:30 IST

तीन वर्षांपूर्वीच पत्रलेखाने तिचे एग्ज फ्रीज केले होते. पण, एग्ज फ्रीज करण्यापेक्षा प्रेग्नंट होणं जास्त सोपं आहे, असं वक्तव्य पत्रलेखाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केलं आहे. 

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि त्याची पत्नी पत्रलेखा लवकरच आईबाबा होणार आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली. पत्रलेखा सध्या तिची प्रेग्नंसीचा काळ एन्जॉय करत आहे. तीन वर्षांपूर्वीच पत्रलेखाने तिचे एग्ज फ्रीज केले होते. पण, एग्ज फ्रीज करण्यापेक्षा प्रेग्नंट होणं जास्त सोपं आहे, असं वक्तव्य पत्रलेखाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केलं आहे. 

पत्रलेखाने सोहा खानच्या ऑल अबाऊट हर या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये बोलताना पत्रलेखाने तिची प्रेग्नंसी जर्नी शेअर केली. त्यासोबतच तरुण मुलींना आणि आई होऊ इच्छिणाऱ्यांना तिने मोलाचा सल्ला दिला आहे. "मी तीन वर्षांपूर्वी माझे एग्ज फ्रीज केले होते. आणि आता मी प्रेग्नंट आहे. मला वाटतं की प्रेग्नंट होणं हे एग्ज फ्रीज करण्यापेक्षा जास्त सोपं आहे. तेव्हा मला माझ्या डॉक्टरांनी एग्ज फ्रीज करणं किती कठीण असेल हे सांगितलं नव्हतं. एग्ज फ्रीज केल्यानंतर माझं वजन प्रचंड वाढलं होतं. त्यामुळे मी तरुण मुलींना हाच सल्ला देईन की त्यांनी एग्ज फ्रीज करण्यापेक्षा प्रेग्नंट व्हा. एग्ज फ्रीज करण्याच्या कठीण प्रोसेसपेक्षा हे जास्त सोपं आहे" असं पत्रलेखा म्हणाली. 

दरम्यान, राजकुमार राव आणि पत्रलेखा २०२१ मध्ये लग्नबंधनात अडकले. त्याआधी ते अनेक वर्ष एकमेकांना ओळखत होते. लग्नानंतर ४ वर्षांनी पत्रलेखाने गुडन्यूज दिली आहे. आता लवकरच त्यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. 

टॅग्स :पत्रलेखाराजकुमार रावप्रेग्नंसी