Join us  

दीपिका पादुकोणसोबत 'छपाक'मध्ये विक्रांत मेस्सीची जागी हा अभिनेता होता पहिली पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 5:30 PM

मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' चित्रपटाचे दीपिका पादुकोण व विक्रांत मेस्सी चित्रीकरण करत आहे. विक्रांत मेस्सीच्या जागी आधी बॉलिवूडमधील एका दुसऱ्या अभिनेत्याची वर्णी लागली होती.

मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' चित्रपटाचे दीपिका पादुकोण व विक्रांत मेस्सी चित्रीकरण करत आहे. विक्रांत मेस्सीच्या जागी आधी बॉलिवूडमधील एका दुसऱ्या अभिनेत्याची वर्णी लागली होती. हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून अभिनेता राजकुमार राव होता. 

एका मुलाखतीत राजकुमारने सांगितले की, मेघना गुलजारच्या छपाक चित्रपटात त्यांची पहिली पसंती स्वतः तो होता. पण, राजकुमार राव त्या आधीच दुसऱ्या कोणत्या तरी सिनेमाला तारखा दिल्या होत्या. त्यामुळे पण त्याला या चित्रपटात काम करायची असतानादेखील हा सिनेमा सोडावा लागला. त्यानंतर ही भूमिका विक्रांत मेस्सीला देण्यात आली.

राजकुमार रावने याबदद्ल सांगितले की, मी हा सिनेमा नाकारला नाही. मला या चित्रपटाची स्टोरी खूप आवडली होती. पण, मेघना गुलजार शूटिंगसाठी तारखा मागत होत्या. माझ्याकडे तारखा उपलब्ध नव्हत्या. ही गोष्ट मेघना गुलजार व दीपिका पादुकोणला सांगितली. पण माझ्यामुळेच मला या सिनेमात काम करायला मिळाले नाही. मला या गोष्टीचे दुःख आहे.

दीपिका पादुकोण छपाक चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करते आहे. या चित्रपटात अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवाल हिच्या संघर्षाची आणि खडतर प्रवासाची कथा रेखाटण्यात आली आहे. यात लक्ष्मीच्या भूमिकेत दीपिका पादुकोण दिसणार आहे.

तर विक्रांत लक्ष्मीचा लिव्ह इन पार्टनर आलोक दीक्षितच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. विक्रांत आणि दीपिकाची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना कितपत भावते, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू असून हा सिनेमा १० जानेवारी २०२०ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :छपाकदीपिका पादुकोणराजकुमार राव