Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाप रे बाप, राजकुमार रावला लागली सिनेमांची लॉटरी, एकाचवेळी साइन केले इतके सिनेमे, मानधनातही केली वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 11:07 IST

राजकुमार रावची गणना आज बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्यांमध्ये केली जाते. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता राजकुमारच्या अभिनय आणि स्टायलचे लाखो दिवाने आहेत.

एकापाठोपाठ सतत हिट फिल्म देणार्‍या राजकुमारने रसिकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. त्याने आपल्या अभिनयाने  सा-यांचीच मनं जिंकली आहेत. पुन्हा एकदा राजकुमार राव रसिकांचे फुल ऑन मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. म्हणूनच  2021 नवीन वर्ष राजकुमार रावच्याच नावावर असेल. राजकुमार रावने  एक नाही दोन नाही तर एकाच वेळी तीन सिनेमे साइन केले आहेत. 

मीडिया रिपोर्टनुसार राजकुमारने तीनही सिनेमांसाठी तयारीही सुरु केली आहे.त्याने त्याच्या मानधनातही वाढ केली आहे. एका सिनेमासाठी  जवळपास 10 कोटी रुपये कोटी मानधन घेतले असल्याचे चर्चा आहे. 2020 पूर्ण कोरोना संकटात गेले.त्यामुळे आता आगामी काळात  राजकुमार राव  नवीन उंची गाठेल अशी अपेक्षा आहे. तसे, 2020 देखील राजकुमार रावसाठी चांगले ठरले.  

'लुडो', 'छलांग' सिनेमा हिट ठरले. आता पुढच्या वर्षीही राजकुमार राव वेगवेगळ्या भूमिकांमधून रसिकांच्या भेटीला येणार आहे. राजकुमार रावची तयारीही जोरात सुरू आहे. त्यांच्या फिटनेसवर ते विशेष लक्ष देत आहेत. ते सतत वर्कआऊट करत पिळदार बॉडी कमावण्यासाठी मेहनतही करत आहे. अलीकडेच त्याच्या सोशल मीडियावरील एक फोटो व्हायरल झाला आहे.राजकुमारची फिटनेसवर कशाप्रकारे वर्कआऊट करत आहे या फोटोतून स्पष्ट होते. 

राजकुमार रावची गणना आज बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्यांमध्ये केली जाते. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता राजकुमारच्या अभिनय आणि स्टायलचे लाखो दिवाने आहेत. अलीकडे दिलेल्या एका मुलाखती दरम्यान राजकुमारने सांगितले की तो अभिनेता शाहरुख खानचा फॅन आहे. पहिल्यांदा अकरावीत असताना मुंबईत आलो होतो तेव्हा मी 'मन्नत' (शाहरुख खानच्या घराबाहेर) च्या बाहेर अनेक तास उभा होतो. शाहरुखची एक तरी झलक मला पाहायला मिळावी अशी माझी इच्छा होती. अनेक तास उभे राहिल्यानंतर देखील मला शाहरुखला पाहायला न मिळाल्याने मला खूप वाईट वाटले होते. 

मी शाहरुख खानला सगळ्यात पहिल्यांदा चित्रीकरणाच्या निमित्ताने मेहबुब स्टुडिओत भेटलो. मी त्याला भेटलो त्यावेळी त्याला माझ्याविषयी सगळे काही माहीत होते. हे ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला होता. पण याच सगळ्या गोष्टी त्याला खास बनवतात असे मला वाटते. मी आज त्याला कधीही फोन, मेसेज करू शकतो. तो देखील मला अनेकवेळा फोन करतो. पण आजही मी त्याचा खूप मोठा फॅन असून त्याला भेटल्यावर, त्याच्याशी फोनवर बोलताना मला तितकाच आनंद होतो.

टॅग्स :राजकुमार राव