Join us

चिखलात लोळताना दिसले राजकुमार राव-पत्रलेखा; अ‍ॅनिव्हर्सरीला शेअर केला पागलपंतीवाला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 18:22 IST

अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि पत्रलेखा (Patralekha) १५ नोव्हेंबरला चंदीगडमध्ये विवाह बंधनात अडकले.

अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि पत्रलेखा (Patralekha) हे सध्या बी-टाउनमधील नवविवाहित जोडपे आहे. मागील महिन्यात १५ नोव्हेंबरला दोघांनी चंदीगडमध्ये लग्न केले. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो खूप व्हायरल झाले होते.दरम्यान आता लग्नाला एक महिना झाला त्यानिमित्ताने अभिनेत्याने असा फोटो शेअर केला जो पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. या फोटोमध्ये पत्रलेखा बिकिनीमध्ये तर राजकुमार शर्टलेस दिसतो आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून राजकुमार राव आणि पत्रलेखा रिलेशनशीपमध्ये होते. लग्न होताच हे कपल अतिशय बोल्ड अंदाजात आपले प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. राजकुमारने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ते दोघेही चिखलात लोळताना दिसत आहेत. पत्रलेखाने बिकिनी घातली आहे तर राजकुमार शर्टलेस आहे. 

यासोबतच राजकुमारने त्यांच्या लग्नाचाही एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून राजकुमारने आपल्या पत्नीला लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'मेरा यार तुम, मेरा प्यार तुम, मेरा दिल भी तुम, दिलदार तुम पत्रलेखा. एक महिना झाला आहे.' यासोबतच त्याने हार्ट इमोजीही शेअर केला आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्यांच्या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. 

टॅग्स :राजकुमार रावपत्रलेखा