Join us
Daily Top 2Weekly Top 5

वीरे दी वेड‍िंग सिनेमानंतर राजकुमार राव -नरग‍िस फाखरीचा '5 वेड‍िंग' या तारखेला रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 14:56 IST

5 वेड‍िंग सिनेमातल्या एका गाण्यात तर या दोघांची केमिस्ट्री इतकी छान जुळून आली आहे की त्यांच्या चाहत्यांसाठी हे गाणे म्हणजे पर्वणी असेल.

'न्यूटन' आणि  'स्त्री' सारखे प्रचंड लोकप्रिय सिनेमा देणारा अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री नर्गिस फाखरी यांची  जोड़ी लवकरच सिनेमा '५ वेडिंग्ज'मध्ये  पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शिका नम्रता  सिंह गुजराल यांच्यामते राजकुमार राव आणि नर्गिस फाखरी मधली सर्वोत्तम केमिस्ट्री या सिनेमात पाहायला मिळेल, जी रसिकांना मनापासून आवडेल,रोमांचित करेल.  नम्रताच्या मते हा सिनेमा त्यांच्या खूप जवळचा आहे,कारण तो जसा हवा तसा साकारला आहे,कारण राजकुमार राव आणि नरगिस फाखरीने त्यात खरोखरच मनापासून जीव ओतून काम केले आहे.विशेष म्हणजे हा सिनेमा म्हणजे एका अमेरिकन पत्रकाराची गोष्ट आहे. जी बातमीचा पाठपुरावा करताना संशोधनासाठी भारतात येते.तिला त्यात ५ लग्नाचे रिपोर्टिंग करायचे असते.त्या दरम्यान भिन्न,वेगवेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक संघर्षात आणि तिच्या यापूर्वी हरवलेल्या प्रेमात ती कशी अडकत जाते याची ही जगावेगळी गोष्ट आहे.

'रॉकस्टार', 'अजहर' आणि 'मैं तेरा हीरो' सारख्या सिनेमानंतर एका छोट्या ब्रेकनंतर ती नरगिस पुन्हा या सिनेमात झळकणार आहे.तर  सध्या  तरूणींच्या दिलों की धडकन असलेला  राजकुमार राव या सिनेमात खाकी वर्दीतला दमदार पोलीस साकारणार असून त्याच्या चाहत्यांनाही त्याला या भूमिकेत पाहणे मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे.  

विशेष म्हणजे या सिनेमाचा प्रीमियर कान्समध्ये झाला, तर मेलबर्न चित्रपट महोत्सवात त्याचे प्रचंड कौतुक झाले. सिनेमाच्या निर्मात्या आणि दिग्दर्शिका नम्रता सिंह गुजराल मुळच्या अमेरिकेतल्या आहेत.त्यांनी सांगितले की, शूटिंगदरम्यान सेटवर राजकुमार आणि नर्गिस इतके धमाल करायचे की, त्यातून एक मस्त वातावरण तयार झाले आणि त्यामुळे एकंदर हा सिनेमाही खूप चांगला जमून आला आहे, सिनेमातल्या एका गाण्यात तर या दोघांची केमिस्ट्री इतकी छान जुळून आली आहे की त्यांच्या चाहत्यांसाठी हे गाणे म्हणजे पर्वणी असेल. राजकुमार आणि नर्गिसही त्यामुळेच या सिनेमाबद्दल विशेष उत्साही आहेत.दिग्दर्शिका नम्रता  सिंह गुजराल यांच्या मते या सिनेमाचे शूटिंग त्यांच्या आयुष्यातला अविस्मरणीय अनुभव ठरला. इउनीग्लोब एन्टरटेंमेन्ट आणि अमाश फ़िल्मच्या  बॅनरखाली तयार झालेल्या या सिनेमाला मीडिया इंटरनेशनल बॅनर सादर करत असून येत्या २६ ऑक्टोबरला सर्वत्रच  हिंदी आणि इंग्रजीत हा प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :राजकुमार रावनर्गिस फाकरी