Join us

राजकुमार राव गर्लफ्रेंडसोबत कोणत्या देशात न्यू इअरचे सेलिब्रेशन करीत असेल?, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2017 20:47 IST

अभिनेता राजकुमार राव गर्लफ्रेंड पत्रलेखासोबत न्यू इअरचे सेलिब्रेशन करण्यासाठी विदेशात पोहोचला आहे. याठिकाणचे काही फोटोज् त्याने इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहे.

सध्या संपूर्ण जग नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. प्रत्येकजण आपापल्यापरीने नव्या वर्षाचे सेलिब्रेशन करीत आहे. सेलिब्रिटींबद्दल सांगायचे झाल्यास, बरेचसे स्टार सध्या विविध देशांमध्ये नव्या वर्षाच्या स्वागताचा आनंद एन्जॉय करीत आहे. अभिनेता राजकुमार राव हादेखील मीडियाच्या नजरा चुकवीत गर्लफ्रेंड पत्रलेखा आणि मित्रांसोबत नव्या वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी विदेशात पोहोचला आहे. त्याठिकाणचे काही फोटोज् त्याने इन्स्टाग्रामवर अपलोड केले असून, त्यामध्ये तो आपल्या गर्लफ्रेंड आणि मित्रांसोबत एन्जॉय करताना दिसत आहे. दरम्यान, या सेलिब्रेशनचे काही फोटोज दोघांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. रिपोर्ट्सनुसार, राजकुमार राव आणि त्याची गर्लफें्रड पत्रलेखा त्याच्या एका कॉमन मित्राच्या लग्नासाठी थायलॅण्ड येथे गेले होते. यावेळी त्यांनी सुट्या एन्जॉय करण्याचा प्लान केला होता. सध्या दोघेही थायलॅण्डमध्ये असून, नव्या वर्षाचे सेलिब्रेशन करीत आहे. यावेळी शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये हे दोघे ‘जुम्मा-चुम्मा’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच शेअर केला जात आहे.  दरम्यान, राजकुमार रावसाठी २०१७ हे वर्ष खूप चांगले गेले. या वर्षातील त्याच्या बहुतांश चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर चांगले यश मिळविले. तसेच त्याच्या ‘न्यूटन’ हा चित्रपट आॅस्करच्या रेसमध्ये होता. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. परंतु दुर्दैवाने हा चित्रपट आॅस्करपर्यंत पोहोचू शकला नाही. परंतु एकंदरीत त्याच्या सर्वच चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकली.