'३ इडियट्स', 'मुन्नाभाई एमबीबीएस' असे एकापेक्षा एक हिट सिनेमे देणारे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या आगामी सिनेमांची सर्वांनाच उत्सुकता आहे. सध्याच्या सीक्वेलच्या ट्रेंडमध्ये त्यांच्या या दोन्ही सिनेमांचा पुढचा पार्ट येणार अशी चर्चा आहे. ३ इडियट्सचा सीक्वेल आणि मुन्नाभाईचा तिसरा पार्ट येणार असल्याचं बोललं जात होतं. आता अखेर राजकुमार हिरानी यांनी स्वत:च त्यावर भाष्य केलं आहे.
एका मुलाखतीत राजकुमार हिरानी म्हणाले,"मी सध्या मुन्नाभाई फ्रँचायझीचा पुढचा सिनेमा आणि ३ इडियट्सचा सीक्वेल या दोन्ही सिनेमांवर काम करत आहे. मुन्नाभाई सिनेमाची पुढची गोष्ट माझ्याकडे तयार होती ज्यावर मोठ्या प्रमाणात कामही झालं. पण मला गोष्टीचा योग्य शेवट मिळाला नाही. अशा वेळी कधी कधी तुम्ही त्या दिवसाची वाट पाहता जेव्हा तुम्हाला हवी तशी आयडिया मिळेल. मी त्यावर काम करणारच आहे. माझ्याजवळ एक तिसरी स्क्रिप्टही आहे. आता कोणत्या सिनेमावर काम करायचं याचा निर्णय मला लवकरच घ्यावा लागेल."
राजकुमार हिरानींच्या सांगण्यावरुन हे कळतं की मुन्नाभाईचा तिसरा पार्ट नक्की येणार आहे. हिरानींचा शेवटचा सिनेमा 'डंकी' होता ज्यात शाहरुख खान, तापसी पन्नू दिसले होते. सिनेमाने चांगली कमाईही केली होती. तसंच शाहरुख खानने पहिल्यांदाच हिरानींसोबत काम केलं. आता मुन्नाभाईचा तिसरा पार्ट कधी येणार याकडे चाहत्यांचं लक्ष आहे.
Web Summary : Rajkumar Hirani is working on both 'Munnabhai' and '3 Idiots' sequels. A 'Munnabhai' script exists, but a satisfying ending is missing. Hirani will soon decide which film to pursue next after 'Dunki's' success, fueling fan anticipation.
Web Summary : राजकुमार हिरानी 'मुन्नाभाई' और '3 इडियट्स' दोनों के सीक्वल पर काम कर रहे हैं। 'मुन्नाभाई' की स्क्रिप्ट मौजूद है, लेकिन संतोषजनक अंत गायब है। 'डंकी' की सफलता के बाद हिरानी जल्द ही तय करेंगे कि अगली फिल्म कौन सी बनानी है, जिससे प्रशंसकों की उम्मीदें बढ़ गई हैं।