Join us  

संजय दत्तच्या 'मुन्ना भाई ३'वर राजकुमार हिरानींनी सोडलं मौन, म्हणाले - "मी खूप उत्सुक असलो, तरी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 10:01 AM

Rajkumar Hirani on Munna Bhai 3 : 'डंकी'च्या आधी दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी अनेक उत्तमोत्तम चित्रपट केले आहेत. ज्यामध्ये संजय दत्त स्टारर 'मुन्ना भाई' फ्रँचायझीच्या नावाचाही समावेश आहे. राजकुमार यांनी आतापर्यंत या चित्रपटाचे दोन भाग केले आहेत आणि दोन्ही हिट ठरले आहेत.

'डंकी'(Dunki Movie)च्या आधी दिग्दर्शक राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांनी अनेक उत्तमोत्तम चित्रपट केले आहेत. ज्यामध्ये संजय दत्त (Sanjay Dutt) स्टारर 'मुन्ना भाई' फ्रँचायझीच्या नावाचाही समावेश आहे. राजकुमार यांनी आतापर्यंत या चित्रपटाचे दोन भाग केले आहेत आणि दोन्ही हिट ठरले आहेत. या फ्रँचायझीच्या तिसरा भाग म्हणजेच 'मुन्ना भाई ३'ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, राजकुमार हिरानी यांनी 'मुन्ना भाई ३' (Munna Bhai 3) बाबत अपडेट दिले आहेत.

शाहरुख खान अभिनीत 'डंकी'च्या प्रमोशनदरम्यान राजकुमार हिरानी यांना 'मुन्ना भाई ३'बद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत राजकुमार यांनी या चित्रपटाबद्दल मोकळेपणाने सांगितले. ते म्हणाले की, ''मुन्ना भाई फ्रँचायझीचे शेवटचे दोन चित्रपट खूप चांगले होते. माझ्याकडे आजपर्यंत ५ अपूर्ण स्क्रिप्ट आहेत, पण जोपर्यंत मी त्या दोन चित्रपटांच्या कथेशी जुळवू शकत नाही.तो पर्यंत मुन्ना भाई ३ चित्रपट बनवू शकत नाही. या फ्रँचायझीमध्ये आणखी एक चित्रपट करण्यासाठी मी खूप उत्सुक असलो तरी मी त्यावर कधी काम करणार हे अद्याप ठरवलेले नाही. यासाठी मला संजय दत्तचा फोन येतो. पण आताच काही सांगणे उचित ठरणार नाही. होय, माझ्याकडे एक कथा आहे. जे करता येईल असे मला वाटते. मला ते बनवावंसं वाटत आहे. ''

राजकुमार हिरानींच्या 'डंकी'नं केली कमाल नुकताच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला राजकुमार हिरानी यांचा 'डंकी' हा चित्रपट सध्या चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करत आहे. हा सिनेमा रिलीज होऊन एक आठवडा झाला आहे. परिस्थिती अशी आहे की रिलीजच्या ९ दिवसांनंतर शाहरुख खान स्टारर 'डंकी' बॉक्स ऑफिसवर १७० कोटींचा गल्ला जमवण्याच्या मार्गावर आहे.

टॅग्स :राजकुमार हिरानीसंजय दत्तडंकी' चित्रपट