Join us

​‘2.0’ मध्ये रजनीकांतचा डबल नव्हे ट्रिपल रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2016 21:11 IST

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत त्याच्या आगामी ‘2.0’ या चित्रपटात ट्रिपल रोलमध्ये दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रजनीकांतचा 2010 साली आलेला ...

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत त्याच्या आगामी ‘2.0’ या चित्रपटात ट्रिपल रोलमध्ये दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रजनीकांतचा 2010 साली आलेला सुपरहिट चित्रपट ‘रोबोट’चा ‘2.0’ सिक्वल आहे. आतापर्यंत रजनीकांतने आपल्या अनेक चित्रपटात डबल रोल केले आहेत. मात्र तो पहिल्यांदाच एका चित्रपटात ट्रिपल रोल साकारताना दिसणार आहे.  सध्या मीडियात रजनीकांतच्या ट्रिपल रोलची बातमी चांगलीच व्हायरल होत आहे. ‘रोबोट’ या चित्रपटात रजनीकांतने डबलरोल साकारला होता. यात तो वैज्ञानिक व रोबोट या दोन्ही भूमिकेत प्रेक्षकांना भावला होता. ‘2.0’ मध्ये तो रोबोट प्रमाणेच वैज्ञानिक व रोबोट या दोन्ही रुपात दिसेल मात्र तिसºया रुपात मात्र तो बॅडमॅनच्या रुपात दिसणार आहे. यामुळे ‘रजनीकांत व्हर्सेस रजनीकांत’ अशी फाईट पहायला मिळणार असल्याचे सांगण्यात येते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटात बॉलिवूड स्टार अक्षय कुमारची महत्त्वाची भूमिका असली तरी तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अक्षयाचा लूक कावळ्यासारखा असणार आहे. या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली असून पोस्ट प्रोडक्शचा कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या चित्रपटाला ए.आर. रहमान यांनी संगीत दिले आहे. ‘2.0’मध्ये केवळ एकच गाणे असल्याचे सांगण्यात येते. मात्र याचा अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. एस.शंकर दिग्दर्शित करीत असलेल्या या चित्रपटात रजनीकात, अक्षय कुमारसह एमी जॅक्सनची प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. दाक्षिणात्या चित्रपटात डबल रोल असलेले चित्रपट यशस्वी होतात असे मानले जाते. मात्र त्रिपल रोल साकारून रजनीकांत नवा पायंडा पाडणार असल्याचे दिसते.