रजनीकांतचे ट्विटर अकाऊंट हॅक !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 16:52 IST
‘कबाली’चा सुपरस्टार रजनीकांतचे अधिकृत ट्विटर अकाउंट कोणीतरी हॅक केले असल्याचे ऐकूण त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांच्या ट्विटर अकाऊंट ...
रजनीकांतचे ट्विटर अकाऊंट हॅक !
‘कबाली’चा सुपरस्टार रजनीकांतचे अधिकृत ट्विटर अकाउंट कोणीतरी हॅक केले असल्याचे ऐकूण त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांच्या ट्विटर अकाऊंट वरून रात्री ‘रजनीकांत#हिटटूकिल’ असे ट्विट करण्यात आले होते. काही वेळानंतर रजनीकांत यांचे अकाऊन्ट हॅक केले गेले आहे अशी माहिती मिळाली. अकाऊन्ट हॅक केल्यानंतर काही तासांनी रजनीकांत यांची मुलगी दिग्दर्शक ऐश्वर्या आर धनुषने ट्विट करुन सांगितले की, ‘रजनीकांत यांचे अकाऊन्ट हॅक केले गेले होते. त्यांनी स्वत:हून असे कोणतेही ट्विट टाकले नाही. आता त्यांचे हे अकाऊन्ट आता पूर्ववत झाले आहे.’आतापर्यंत रजनीकांत यांनी अकाउन्ट सुरु केल्यापासून ते ट्विटरवर फार सक्रिय नसतात. त्यामुळेच अनेक महिन्यांनी त्यांच्या अकाउन्टमधून अशा प्रकारचे ट्विट आल्यानंतर रजनीकांत यांच्या चाहत्यांना धक्काच बसला.