Join us
Daily Top 2Weekly Top 5

रजनीकांतने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता मिशनला दिले समर्थन; वाचा रजनीकांतने काय लिहिले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 18:56 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाला आणखी एका अभिनेत्याने समर्थन दिले आहे. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणीही ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाला आणखी एका अभिनेत्याने समर्थन दिले आहे. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणीही नसून, सुपरस्टार रजनीकांत आहेत. रजनीकांत यांनी ‘स्वच्छता ही सेवा’ या महत्त्वाकांक्षी अभियानाला समर्थन देताना शुक्रवारी एक ट्विट केले. त्यांनी लिहिले की, ‘स्वच्छता ही सेवा या अभियानाला मी समर्थन देतो. स्वच्छता हीच देशभक्ती आहे.’ वास्तविक पीएम मोदी यांचे हे अभियान यशस्वी करण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार समोर येत आहे. पीएम मोदी यांनीच हे अभियान यशस्वी करण्यासाठी बॉलिवूडमधील कलाकारांसह, उद्योगपती आणि अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींना पत्र लिहून या अभियानाला जुळण्यासाठी अपील केले. आता या यादीत सुपरस्टार रजनीकांत यांचेही नाव जोडले गेले आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते की, ‘येत्या गांधी जयंतीला म्हणजेच २ आॅक्टोबर रोजी देशभर स्वच्छता अभियानाचे व्यापक स्वरूप करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करायचे आहे. २ आॅक्टोबर २०१४ रोजी मोदी यांनी स्वत: हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियानाची व्यापक सुरुवात केली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत अनेक प्रसिद्ध व्यक्ती या अभियानाला जोडले गेले होते.  असो, सुपरस्टार रजनीकांतविषयी सांगायचे झाल्यास, गेल्या काहीकाळापासून रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. ते भाजपामध्ये प्रवेश करतील अशीही शक्यता वर्तविली जात आहे. रजनीकांत दक्षिण भारतात खूप प्रसिद्ध आहेत. तेथील लोक त्यांची पूजा करतात. त्यांचे स्टारडम बघून ते निवडणूक सहज जिंकू शकतील असेच काहीसे चित्र आहे. तामिळनाडूच्या राजकारणात जर त्यांचा प्रवेश झाला तर तेथील चित्र पालटलेले दिसेल यात शंका नाही. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी याअगोदरच स्पष्ट केले होते की, जर रजनीकांत यांना राजकारणात यायचे असेल तर भाजपामध्ये त्यांचे स्वागत आहे.