रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाच्या फर्स्ट लूकची चाहत्यांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. अखेर आज ही प्रतीक्षा संपली. लाइका प्रॉडक्शनने काही क्षणांपूर्वी रजनीकांत यांच्या आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक आणि नाव जाहीर केले. या चित्रपटाचे नाव आहे, ‘दरबार’. आधी हा चित्रपट ‘थलाइवा १६७’ या नावाने प्रदर्शित होणार होता. पण नंतर हे नाव बदलून ‘दरबार’ असे या चित्रपटाचे नामकरण करण्यात आले.‘दरबार’मध्ये रजनीकांत पोलिस अधिका-याच्या भूमिकेत आहेत. ‘आप यह फैसला ले सकते हैं कि मैं आपके साथ अच्छा रहूं, बुरा रहूं या बहुत खराब रहूं,’ असे या पोस्टरवर लिहिले आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. या चित्रपटातही रजनीकांत यांचे ‘फाडू’ डायलॉग्स ऐकायला मिळणार आहेत.
रजनीकांत यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा, पाहा, फर्स्ट लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 12:35 IST
रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाच्या फर्स्ट लूकची चाहत्यांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. अखेर आज ही प्रतीक्षा संपली. लाइका प्रॉडक्शनने काही क्षणांपूर्वी रजनीकांत यांच्या आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक आणि नाव जाहीर केले.
रजनीकांत यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा, पाहा, फर्स्ट लूक
ठळक मुद्देरजनीकांत हे ‘मास एंटरटेनर’ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या प्रत्येक चित्रपटावर लोकांच्या उड्या पडतात.