Join us
Daily Top 2Weekly Top 5

डिंपल कपाडियासह लग्न केल्यानंतरही सुरू होते राजेश खन्ना यांचे एक्स्ट्रा मॅरिटिअल अफेअर, कोण होती 'ती'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 13:03 IST

'सौतन' सिनेमाच्यावेळी दोघांमध्ये जवळीक वाढु लागली.दोघांचीही मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे दोघांनाही कळले नाही.

बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना आपल्या चॉकलेट इमेज आणि लव्हर ब्वॉय चार्ममुळं चित्रपटरसिकांना वेड लावलं... रुपेरी पडद्यावर प्रेम तसंच विरहगाथा त्यांनी कधी हसवत तर कधी डोळ्यात आसवं आणत निभावल्या आणि इतिहास रचला.

 

त्याकाळातल्या अनेक अभिनेत्रींशी राजेश खन्ना यांची सिनेमात जोडी जमली...त्याकाळी रिल लाईफप्रमाणे रिअल लाईफमध्ये राजेश खन्ना यांचं नाव अनेक अभिनेत्रींशीही जोडलं गेलं होतं. यांत अभिनेत्री टीना मुनिमचंही नाव होतं. राजेश खन्ना आणि टीना मुनिम या जोडीनं एकाहून एक सरस सिनेमा दिलेत. 

'सौतन' सिनेमाच्यावेळी दोघांमध्ये जवळीक वाढु लागली.दोघांचीही मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे दोघांनाही कळले नाही.टीना मुनिमही दोघांच्या या नात्याला घेवून खूप सीरियस होते.दोघेही प्रेमात आकंठ बुडाले होते.टीनाला त्यांच्याशी लग्न करायचे होते. अनेकदा टीनाने राजेश खन्ना यांना ही गोष्ट सांगितली,मात्र राजेश खन्ना या गोष्टीकडे नेहमी दुर्लक्ष केले.टीना मुनिमला राजेश खन्नाच्या अशा वागण्याचा संताप येत होता.त्यामुळे तिनेही त्यांच्याशी लांबच राहण्याचा  प्रयत्न केला.मात्र त्यावेळी राजेश खन्ना वारंवार डिंपलला घटस्फोट दिल्यानंतर टीनाशी लग्न करण्याचे आश्वासन दिले होते.

दोघांचेही अफेअर सुरू असताना  राजेश खन्ना यांनी डिंपलला एकदाही घटस्फोट देणार असल्याचे सांगितले नव्हते.त्यामुळे राजेश खन्नाकडून वारंवार मिळणा-या त्या कारणांमुळे हैरान होवून टीना मुनिमने राजेश खन्नासह ब्रेक करत दूर जाणेच पसंत केले.

राजेश खन्नाला टीना यांना आवडायची त्यामुळे तिला खूप समजवण्याचाही त्यांनी प्रयत्न केल्याचे बोलले जाते.मात्र तेव्हा राजेश खन्नावर आता काडीमात्र भरोसा नसल्याचे सांगत राजेश खन्ना यांच्या आयुष्यातून टीना मुनिमने निघून जाणेच पसंत केले.

राजेश खन्ना आणि टीना मुनिम यांची ‘सुराग’, ‘सौतन’, ‘अलग-अलग’, ‘आखिर क्यों, ‘अधिकार’ यासारख्या सिनेमातून या दोघांची केमिस्ट्रीही रसिकांनी खूप पसंत केली होती.टीना मुनिमसह ब्रेक झाल्यानंतरही राजेश खन्ना यांनी डिंपलला घटस्फोद दिला नसला तरीही ते डिंपलसह काही वर्षच एकत्र राहिले होते. 

टॅग्स :राजेश खन्नाडिम्पल कपाडिया