Join us
Daily Top 2Weekly Top 5

​राज ठाकरेच्या मुलीची बॉलिवूड एंट्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2017 17:04 IST

महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान निर्माण केलेल्या ठाकरे घराण्याने कलाप्रेमी आहे. स्वत: बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार होते. यामुळे क लेबद्दलचा आदर ...

महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान निर्माण केलेल्या ठाकरे घराण्याने कलाप्रेमी आहे. स्वत: बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार होते. यामुळे क लेबद्दलचा आदर सर्वांनाच आहे. बाळासाहेबांचा चित्रपटसृष्टीशी जवळचा संबध होता. हा संबध उद्धव व राज ठाकरे यांनी कायम ठेवला आहे. राज ठाक रे यांच्या पुढच्या पिढीने देखील बॉलिवूडशी नाळ जुळवून घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. राज ठाकरे यांची मुलगी उर्वर्शी हिने बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली असल्याचे वृत्त सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. वृत्तवाहिनी आयबीएन लोकमत ने दिलेल्या बातमीनुसार, उर्वशी ठाकरे हिला फॅशन आणि सिने इंडस्ट्रीची आवड आहे. काही दिवसांपूर्वी उर्वशीनं फॅशन इंडस्ट्रीत एन्ट्री केल्याचे बातमी व्हायरल झाली होती. आता तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आहे. उर्वशीने अभिनेत्री म्हणून नव्हे तर सहायक दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आहे.डेव्हिड धवनच्या आगामी सिनेमासाठी उर्वशी सहायक दिग्दर्शक म्हणून काम पाहतेय. वरुण धवन याची मुख्य भूमिका असलेला ‘जुडवा २’ या चित्रपटाची ती सहाय्यक दिग्दर्शक आहे. या चित्रपटात ती दिग्दर्शक रोहित धवन यांना सहाय्य करणार आहे. जुडवा २ हा चित्रपट २९ सप्टेंबरला रिलीज होतोय. या चित्रपटाची सहाय्यक दिग्दर्शक असलेली उर्वशी बॉलिवूड चित्रपट निर्मितीचे बारकावे शिकत असल्याचे सांगण्यात येत आसहे.  येत्या काळात उर्वशी एक चांगली महिला सिने दिग्दर्शक म्हणून समोर आल्याच आश्चर्य वाटण्यासारखे नाही.तर दुसरीकडे राज ठाकरे यांचा मुलगा अमित याचाही हळूहळू राजकीय क्षेत्रातील वावर वाढतो आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारात अमित सहभागी होणार आहे. नुकतच अमितने फेसबुकवर आॅफिशिअल पेज तयार केलं आहे. विशेष म्हणजे या पेजवर अमितनं वडिलांचं व्यंगचित्र पोस्ट केलं आहे. त्यामुळे ठाकरे कुटुंबाचा कलेचा वारसा आता अमित आणि उर्वशी पुढे घेउन आहेत असेच म्हणावे लागेल.