Join us
Daily Top 2Weekly Top 5

ना मास्क, ना हेल्मेट, करवा चौथला राज कुंद्राने चाळणीने चेहरा लपवल्याने झाला ट्रोल, नेटकरी म्हणाले- हद झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 12:12 IST

राज कुंद्राला पाहताच त्याला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पापाराझींची गर्दी जमली.

गुरुवारी देशभरात करवा चौथ साजरा करण्यात आला. सर्वसामन्यापासून ते सेलेब्रिटींपर्यंत सर्वांनी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. मौनी रॉय, गीता बसरा, रवीना टंडन, सुनीता कपूर, कतरिना कैफ हा सण साजरा केला. करवा चौथ उत्सवाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. राज कुंद्राचा एक व्हिडिओही समोर आला आहे. गंमत म्हणजे यावेळी राज कुंद्रा मास्क किंवा हेल्मेटने नव्हे तर चाळणीने चेहरा लपवताना दिसला.

अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांच्या घरी बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनी करवा चौथची पूजा केली. यावेळी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राही तेथे पोहोचला. राज कुंद्राला पाहताच त्याला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पापाराझींची गर्दी जमली. यावेळी उपस्थित लोकांना राजची वेगळीच शैली पाहायला मिळाली. अनिल कपूरच्या घरी जाताना राज कुंद्रा चाळणीतून चेहरा लपवताना दिसला. 

राज कुंद्राचा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक त्याला ट्रोल करतायेत. एका नेटकऱ्यांनं लिहिलंय,चांद छिपा चांदनी में. दुसऱ्या एकाने लिहिले, ही तर हदच झाली. एका नेटकऱ्यांने लिहिले, फुल ड्रामा, भाऊ तू चंद्र नको पाहूस त्यालाही डाग लागेल'.  अशा मजेशीर कमेंट्स राज कुंद्राच्या व्हिडीओ येण्याची ही पहिलीच वेळ नाही. जेव्हा जेव्हा तो सार्वजनिक ठिकाणी दिसतो तेव्हा नेटकरी त्याला पाहून कमेंट्स करत असतात.  

टॅग्स :राज कुंद्राशिल्पा शेट्टी