पावसाने बॉलिवूडलाही केले चिंब; पहा पाच आयकॉनिक पाऊस गाणी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2017 18:45 IST
राज्यातील बहुतांश भागात सध्या मान्सूनने धडक दिली असून, सगळीकडे चिंब वातावरण निर्माण झाले आहे. पावसाच्या बरसणाºया सरी अन् बेधुंद करणारे चित्रपटातील एखादे पाऊस गाणे कानावर पडले की, स्वप्नात रममाण होऊन जावेसे वाटते.
पावसाने बॉलिवूडलाही केले चिंब; पहा पाच आयकॉनिक पाऊस गाणी!
राज्यातील बहुतांश भागात सध्या मान्सूनने धडक दिली असून, सगळीकडे चिंब वातावरण निर्माण झाले आहे. पावसाच्या बरसणाºया सरी अन् बेधुंद करणारे चित्रपटातील एखादे पाऊस गाणे कानावर पडले की, स्वप्नात रममाण होऊन जावेसे वाटते. आज आम्ही पावसावर आधारित अशाच पाच आयकॉनिक चित्रपटातील गाणी तुम्हाला सांगणार आहोत. हे गाणे म्हणजे पावसाबरोबरचे समीकरणच होय. आजही या गाण्याचे बोल कानावर पडले की, मान्सून सुरू झाल्याची जाणीव होते. ‘प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल’ हे राजकपूर आणि नर्गिस यांच्यावर चित्रित केलेले ‘आवारा’ चित्रपटातील गाणे पावसाची आठवण करून देणारे आहे. खरं तर या गाण्याला पावसाचा माइलस्टोन असेच समजले जाते. कारण या गाण्याशिवाय ‘बॉलिवूड अन् पाऊस’ जणू काही अर्धवटच आहे. या गाण्यात दोघेही रोमॅण्टिक मुडमध्ये असून, चिंब भिजवणारा पाऊस त्यांच्या प्रेमाला एक वेगळीच उंची गाठून देतो. आता राजकपूर-नर्गिस या जोडीविषयी बोलल्यानंतर अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील यांना विसरून चालणार नाही. ‘नमक हलाल’ चित्रपटात त्यांच्यावर चित्रित केलेले ‘आज रपट जाए तो हमें न उठइयो’ हे गाणे पावसाचे आयकॉनिक सॉँग समजले जाते. त्यावेळी या गाण्याने धूम उडवून दिली होती. अमिताभ आणि स्मिता यांची पावसातील केमिस्ट्री आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. पावसात या गाण्याचे बोल कानावर पडल्यास पाय थिरकल्याशिवाय राहत नाहीत. अनिल कपूर आणि श्रीदेवी यांचा ब्लॉकबस्टर ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटातीलही एक गाणे पावसात रममाण व्हायला लावते. ‘काटे नही कटते ये दिन ये रात, कहनी थी जो तुमसे दिल की बात’ हे रोमॅण्टिक गाणे पावसाची आठवण करून देते. साडीच्या अवतारात पावसात चिंब भिजलेली श्रीदेवी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकविते. १९९० नंतरच्या काळाविषयी बोलायचे झाल्यास ‘मोहरा’ या चित्रपटात अक्षयकुमार आणि रवीना टंडन यांनी ‘टिप टिप बरसा पानी’ या पावसावर आधारित गाण्यात अक्षरश: आग लावली. गाण्यातील दोघांची केमिस्ट्री खूपच चांगली होती. त्यामुळेच हे गाणे आजही पावसाळ्यात ऐकावयास मिळते. ‘राजा हिंदुस्तानी’ या चित्रपटातदेखील पावसावर आधारित गाणे चित्रित करण्यात आले आहे. बरसणाºया ढगांनी आमीर खान आणि करिष्मा कपूरमध्ये एवढी जवळीकता निर्माण केली होती की, दोघांमधील किसिंग सीन कित्येक वर्ष चर्चिला गेला. या गाण्याने सर्वत्र आग लावली होती.