Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुपरस्टार असलेल्या अभिनेत्याचं बदललं आयुष्य, लग्नसमारंभात गाणं गाऊन करतोय उदरनिर्वाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 09:51 IST

Rahul roy: १९९० मध्ये आलेल्या 'आशिकी' या सिनेमाच्या माध्यमातून त्याने इंडस्ट्रीत पदार्पण केलं. विशेष म्हणजे हा सिनेमा त्याकाळी तुफान गाजला.

कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांना पहिल्याच सिनेमातून तुफान यश मिळालं. मात्र, काही काळ इंडस्ट्रीत राहिल्यानंतर हे कलाकार अचानकपणे गायब झाले. सध्या सोशल मीडियावर अशाच एका अभिनेत्याची चर्चा रंगली आहे. हा अभिनेता पहिल्याच सिनेमामुळे रातोरात सुपरस्टार झाला. विशेष म्हणजे त्याने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये कामही केलं. मात्र, आज त्याची अत्यंत वाईट परिस्थिती झाली असून तो उदरनिर्वाहासाठी चक्क लोकांच्या लग्नसमारंभात गाणी गाऊन त्याचा खर्च भागवत आहे.

राहुल रॉय (Rahul roy) हे नाव साऱ्यांच्याच परिचयाचं आहे. १९९० मध्ये आलेल्या 'आशिकी' या सिनेमाच्या माध्यमातून त्याने इंडस्ट्रीत पदार्पण केलं. विशेष म्हणजे हा सिनेमा त्याकाळी तुफान गाजला. या सिनेमासाठी त्याला ३० हजार रुपये इतकं मानधन मिळालं होतं. विशेष म्हणजे आजही या सिनेमातील गाणी लोकप्रिय आहेत.  राहुलने या सिनेमाच्या माध्यमातून कलाविश्वात त्याचं हक्काचं स्थान निर्माण केलं होतं. मात्र, एका आजारपणामुळे त्याचं सगळं आयुष्य विस्कटून गेलं.

फ्लॉप सिनेमांची लागली रांग

आशिकीच्या यशानंतर राहुलकडे सिनेमांच्या रांगा लागल्या होत्या. त्याने ११ दिवसांमध्ये सलग ४७ सिनेमा साइन केले. विशेष म्हणजे कोणताही फारसा विचार न करता सिनेमा साइन केल्याचा फटका त्याला बसला. या ४७ सिनेमांपैकी अनेक सिनेमा फ्लॉप झाले. त्यामुळे सहाजिकच त्याचा परिणाम त्याच्या करिअरवर झाला.

आजरपणामुळे बदललं नशीब

राहुलची लोकप्रियता जितकी लवकर वाढली होती. तितक्याच झपाट्याने त्याची प्रसिद्धी, यश सगळं त्याच्या हातून निसटून गेलं. या सगळ्यामध्येच त्याला आजरपण आलं आणि हळूहळू करत तो सिनेसृष्टीतून दूर गेला.

लग्नसमारंभात गातो गाणी

२०२० मध्ये शुटिंगदरम्यान झालेल्या ब्रेन स्ट्रोकने राहुलचं आयुष्य बदलून गेलं. सध्या तो सिनेसृष्टीत कमी आणि लोकांच्या लग्नसमारंभात जास्त दिसतो. सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल सध्या लग्नसमारंभ, पार्टी यांसारख्या कार्यक्रमात गा ण्याचे शो करतो. त्यामुळे गाणी गाऊन सध्या त्याचा उदनिर्वाह होत असल्याचं म्हटलं जातं. मध्यंतरी राहुलचा बिहारमधील एका लग्नात गाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

टॅग्स :राहुल रॉयबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा